परळीत खळबळ! वैद्यनाथ साखर कारखान्याच्या चोरीत धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्याचा हात

परळीत खळबळ! वैद्यनाथ साखर कारखान्याच्या चोरीत धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्याचा हात

  • Share this:

बीड, 24 डिसेंबर: परळी तालुक्यातील पांगरी येथीव वैद्यनाथ साखर कारखान्यात (Vaidyanath Co-operative Sugar factory, Parli) झालेल्या चोरी प्रकरणात राष्ट्रवादीच्या (NCP) नगरसेविकेच्या पतीचा हात असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

अजीज इस्माईल उर्फ मंगलदादा शेख असं आरोपीचं नाव असून त्याच्याविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मंगलदादादा सध्या फरार असून त्याचा शोध ग्रामीण पोलीस घेत आहेत. मंगलदादा हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा जवळचा कार्यकर्ता असल्याचं समजतं. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा...नाशिक प्रशासन हादरलं! पोलीस प्रशिक्षण केंद्रात 170 जणांना कोरोनाची लागण

वैद्यनाथ साखर कारखाना सध्या भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (BJP Leader Pankaja Munde) यांच्या ताब्यात आहे. पंकजा मुंडे या कारखान्याच्या चेअरमन आहे.

पांगरी येथील वैद्यनाथ साखर कारखान्यात काही मोठी चोरी (Robbery) झाल्याची बाब उघड झाली होती. कारखान्यातून जवळपास 37 लाखांचं साहित्य चोरीला गेलं आहे.

वैद्यनाथ कारखान्याच्या गोडाऊनमधील संगणक व इतर साहित्य चोरीला गेल्याची तक्रार कारखान्यातील लिपिक खदिर शेख यांनी दिली होती. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

कारखान्याचे स्टोअर कीपर जी.टी. मुंडे यांच्याकडून कारखान्याचे लिपिक खदिर शेख यांना चोरीची माहिती समजली. लिपिक आणि लीगल इन्चार्ज यांनी चोरीच्या ठिकाणाची पाहणी केली असता स्टोअर आणि वर्कशॉपच्या मागील बाजूचे शटर उचकटल्यात आल्याचं निदर्शनास आलं. धक्कादायक बाब म्हणजे 13 ऑक्टोबर ते 17 ऑक्‍टोबर या कालावधीत झालेल्या चोरीबाबत तब्बल दोन महिन्यांनंतर कारखाना प्रशासनाला जाग आल्याचं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

स्टोअर गोदाम वर्कशॉप मधून संगणक, मॉनिटर, 200 किलो कॉपर मटेरियल, 400 किलो मिलबोरिंग, ब्रास इंपेरियर, बुश राउंड बार असे एकूण 37 लाख 84 हजार 914 रुपयाचे साहित्य चोरीला गेल्याची तक्रार कारखान्यातील लिपिक खदिर शेख यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा..'संभाजीनगर' आमच्या हृदयात.. 'त्या' बॅनरबाजीवरून शिवसेनेनं राज ठाकरेंना डिवचलं

लॉकडाऊनमध्ये चोरी...

मागच्या वर्षी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना बंद होता. त्यात यंदा कोरोनो संसर्गामुळे राज्यात लॉकडाऊन जाहीर झालं. त्यामुळे कारखाना बंदच होता. याच दरम्यान साखर कारखान्यामध्ये चोरी झाल्याचा संशंय व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, गेल्या कांही महिन्यांपासून परळीत गुन्हेगारी वाढली असून विविध घटनांमुळे नागरिक व व्यापारी कायम दहशतीखाली वावरत आहेत.

Published by: Sandip Parolekar
First published: December 24, 2020, 4:17 PM IST
Tags:

ताज्या बातम्या