महाराष्ट्राच्या राजकारणात बॉलिवूडचा अमर-अकबर-अँथनी, वाचा कोणाला दिली तय्यब अलीची उपमा

महाराष्ट्राच्या राजकारणात बॉलिवूडचा अमर-अकबर-अँथनी, वाचा कोणाला दिली तय्यब अलीची उपमा

महाविकास आघाडी सरकारच्या प्रेमाला विरोध करणारे रावसाहेब दानवे हे तय्यब अली असल्याची उपमा आमदार शेख यांनी दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 08 ऑक्टोबर: महाराष्ट्रातील राजकारणात सध्या अमर-अकबर-अँथनी चित्रपटाची चर्चा रंगली आहे. कारण बॉलिवूडमधील या चित्रपटातील भूमिकांवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगताना पाहायला मिळत आहेत. आता या वादामध्ये समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांनी उडी घेतली आहे. रईस शेख यांनी रावससाहेब दानवेंची तुलना तय्यब अली प्यार का दुश्मन हाय हाय या गाण्यातील तय्यब अलीशी केली आहे. याआधी काँग्रेसच्या नेत्यानं रॉबर्ट शेटशी रावसाहेब दानवेंची तुलना केली आहे.

भाजप नेते रावसाहेब दानवे यांना महाविकास आघाडी सरकारला अमर अकबर अँथनीची उपमा दिली होती. याशिवाय हे सरकार आम्ही पाडणार नाही तर एकमेकांमध्ये पाय अडकून स्वत: पडेल असंही दानवे यांनी खोटक टोला लगावला होता. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी या टोल्याला चोख प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळालं. यावरून सध्या ट्वीटर वॉर सुरू असून त्यामध्ये भिवंडी पूर्वमधील आमदार रईस शेख यांनी उडी घेतली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या प्रेमाला विरोध करणारे रावसाहेब दानवे हे तय्यब अली असल्याची उपमा आमदार शेख यांनी दिली आहे. याआधी राज्याचे गृहमंत्री अनिल देखमुख, रोहित पवार, काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी देखील दानवेंना खुमासदार शैलीत उत्तर दिलं आहे.

हे वाचा-अजितदादांच्या सल्लानंतर 'त्या' भाजप नेत्याच्या अडचणीत वाढ, 'ऑडिओ क्लिप' व्हायरल

हे वाचा-रावसाहेब दानवे म्हणजे 'रॉबर्ट शेठ', काँग्रेस नेत्यानं दिली व्हिलनची उपमा

'महाराष्ट्र सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथोनी आहे. बरोबर आहे. कारण महाराष्ट्राच्या बदनामीचे त्यांचे प्रयत्न आम्ही हाणून पाडतो आणि कोरोना संकटातही राज्य प्रगतीपथावर नेतो, कारण - होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी, एक जगह जब जमा हो तीनो अमर, अकबर, अँथोनी !'असं खुमासदार शैलीत अनिल देशमुख यांनी ट्वीट करून दानवेंना उत्तर दिलं आहे. तर काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी व्हिलन रॉर्बट शेठची उपमा दिली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 8, 2020, 1:25 PM IST

ताज्या बातम्या