आमचंच सरकार येणार म्हणणाऱ्या भाजपचे काही आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात!

आमचंच सरकार येणार म्हणणाऱ्या भाजपचे काही आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात!

राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या पाठिंब्याने शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापनेसाठी वेगवान हालचाली सुरु झाल्या आहेत. उद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची दिल्लीत चर्चा झाल्यानंतर याचा निर्णय़ होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 16 नोव्हेंबर : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह भाजपनेसुद्धा आमचंच सरकार येईल असा दावा केला आहे. एकीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आमच्याकडे 119 संख्याबळ असल्याचं सांगत आहेत. त्या संख्याबळाच्या जोरावर आम्ही राज्याला स्थिर सरकार देऊ असा दावा ते करत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीकडून भाजपला धक्का देणारी माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपचे 15 ते 20 आमदार संपर्कात असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

सरकार स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील महत्त्वाची बैठक उद्या दिल्लीत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी उद्या चर्चा करतील. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि सेनेची विचारधारा वेगळी असली तरी प्रगतीच्या मुद्यांवर आम्ही एकत्र येऊ. सध्यातरी काही सांगता येत नसलं तरी एकमत झाल्यावर निर्णय जाहीर केला जाईल असं राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले.

दिल्लीत होणाऱ्या बैठकीत वरिष्ठांकडून निर्णय होईल. तसेच भाजप त्यांच्याकडे संख्याबळ आहे असं सांगत असेल तर त्यांनी अजुन दावा का केलेला नाही? त्यांनी दावा करावा आणि विश्वासमत ठराव मांडावा अंसही त्यांनी म्हटलं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्र येत आहेत. आमच्यात चर्चा सुरु असून पाच वर्ष स्थिर सरकार राहण्यासाठी आणि जनतेचे प्रश्न कसे सोडवता येईल याचा विचार करूनच निर्णय घेतला जाईल असंही राष्ट्रवादीच्या नेत्याने सांगितलं.

वाचा : राज्यात नवीन समीकरण? भाजपसमोर आहे एकच पर्याय

भारतीय जनता पक्ष आमदार पळवून नेईल असं अनेकांना वाटतं. पण इतर राज्यात केलं तसं इथं करणं भाजपसाठी हानीकारक आहे. आता आघाडीच्या नेत्यांना निर्णय घेण्यासाठी वेळ लागत आहे. त्यातही काँग्रेसकडून दिरंगाई होत असल्याची टीका होत आहे. यावर राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं की, प्रत्येक पक्षाची कामाची आणि निर्णय घेण्याची पद्धत वेगवेगळी आहे. तसेच काँग्रेस योग्य तो निर्णय घेईल तो काय असेल याची उत्सुकता लोकांमध्येही आहे.

वाचा : मुख्यमंत्री करायचं तरी कोणाला? शिवसेनेसमोर यक्ष प्रश्न

निवडणुकीआधी अनेक आमदार, नेते भाजपमध्ये गेले. ते आता आमच्याशी संपर्क साधत असल्याचा खुलासाही राष्ट्रवादीच्या नेत्याने केला. आता ते आमदार आमच्याकडून चुक झाल्याचं खासगीत मान्य करतात. विधानसभेत निवडून आलेल्या आणि पराभूत झालेल्या अशा आमदारांचे विचार बदलतील. पण त्यांच्या मतदारसंघातले जे निष्ठावान पक्षासोबत राहिले त्यांच्याशी चर्चा करूनच अशा संपर्क करणाऱ्यांबद्दल विचार केला जाईल असंही सांगण्यात आलं.

'यारों... ने ये एहसान किया है' संजय राऊत यांचे ट्विट

जेव्हा स्मृती इराणी तलवारबाजी करता, पाहा हा VIDEO

Published by: Suraj Yadav
First published: November 16, 2019, 1:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading