मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शरद पवार इज बॅक, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणाला मिळणार नवे वळण?

शरद पवार इज बॅक, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणाला मिळणार नवे वळण?

  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार 2004 नंतर तब्बल 17 वर्षांनी पुन्हा एकदा पिंपरी-चिंचवडचा राजकारणात सक्रिय झाले आहेत.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार 2004 नंतर तब्बल 17 वर्षांनी पुन्हा एकदा पिंपरी-चिंचवडचा राजकारणात सक्रिय झाले आहेत.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार 2004 नंतर तब्बल 17 वर्षांनी पुन्हा एकदा पिंपरी-चिंचवडचा राजकारणात सक्रिय झाले आहेत.

पिंपरी चिंचवड, 17 ऑक्टोबर : कोरोनाच्या (corona) काळामुळे पुढे ढकलेल्या महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.  राष्ट्रवादीचा (ncp) बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये (pimpri chinchwad) अध्यक्ष शरद पवार (sharad pawar)  मेळावा घेण्यासाठी पोहोचले आहे. त्यामुळे शरद पवार कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करता याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार 2004 नंतर तब्बल 17 वर्षांनी पुन्हा एकदा पिंपरी-चिंचवडचा राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्याआधी शरद पवार हे पंधरा वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघात असलेल्या पिंपरी-चिंचवड भागाचे लोकसभेत प्रतिनिधित्व करत होते. मात्र काही जुन्या मंडळींचा संपर्क वगळता पिंपरी-चिंचवडच्या स्थानिक राजकारणात त्यांनी कधीही लक्ष घातलं नाही. इथली जबाबदारी कायम अजित पवार यांच्यात खांद्यावर होती. जुळ्या भावांसाठी रविवारची रात्र ठरली काळरात्र; 25 व्या मजल्यावरून पडून झाला अंत 2016 च्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादीचा पराभव झाला होता पाठोपाठ 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा मावळ लोकसभेतून पराभव झाला होता. त्यानंतर सरकार आल्यावर ही पिंपरी चिंचवड मधल्या राष्ट्रवादीची मरगळ काही केल्या संपत नव्हती. महापालिका निवडणुका 4 महिन्यांवर येऊन ठेपल्या नंतरही महापालिकेत सत्तांतर होईल, असं कुणी खात्रीने सांगू शकत नाही, स्थानिक राष्ट्रवादीत तसा कुठलाही जोर दिसत नाही. गटबाजीने पोखरलेली राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा रुळावर आणा असे साकडे घालत काही जुनी मंडळी गाऱ्हाणं घेऊन शरद पवारांकडे गेली आणि पवार यांनी थेट पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा लावला. पावसात सोयाबीनची गंजी वाचवताना शेतकरी गेला वाहून; नागरिकांनी वाचवले प्राण शरद पवार यांनी अनेकांना भेटीगाठीसाठी बोलावलं मात्र या सगळ्या दरम्यान अजित पवार आणि अलीकडच्या काळात पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष घालणारे पार्थ पवार यांच्या नेतृत्वावर पवार आणि प्रश्नचिन्ह लावलंय का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या आजच्या कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवार हे कार्यकर्त्यांना काय संबोधित करणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
First published:

Tags: NCP, Sharad pawar, शरद पवार

पुढील बातम्या