'शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही', पॅकेजवर नाराजी व्यक्त करत शरद पवारांनी PM मोदींना लिहिलं खुलं पत्र

'शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही', पॅकेजवर नाराजी व्यक्त करत शरद पवारांनी PM मोदींना लिहिलं खुलं पत्र

शरद पवार यांनी या पॅकेजबाबत नाराजी व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एख खुलं पत्र लिहिलं आहे आणि शेतकऱ्यांच्या स्थितीाबाबत माहिती दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 18 मे : कोरोना व्हायरस आणि देशव्यापी लॉकडाऊनमुळे देशात निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केलं आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या पॅकेजबाबत नाराजी व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक खुलं पत्र लिहिलं आहे आणि शेतकऱ्यांच्या स्थितीबाबत माहिती दिली आहे.

'घोषित करण्यात आलेल्या पॅकेजमुळे त्रस्त शेतकऱ्यांना त्वरित दिलासा मिळणार नाही. लॉकडाऊनमुळे उभे असलेली पिके नष्ट झाली आहेत आणि शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून त्यांना खरीप हंगामातील पिके घेण्यासाठी तातडीच्या मदतीची आवश्यकता आहे,' असं शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

नक्की काय म्हणाले शरद पवार?

- कृषी क्षेत्र मोठ्या संकटात सापडले आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी तातडीने हस्तक्षेप करून शेतकर्‍यांच्या हालअपेष्टा दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत़.

- कृषी कर्जाची पुनर्रचना, व्याजदर कमी करणे, परतफेडीसाठी मुदत वाढविणे इत्यादी तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी मी आग्रह केला आहे.

- पशुसंवर्धन पायाभूत सुविधा, मत्स्यपालन, मायक्रो फूड एंटरप्रायजेस यासाठी जाहीर केलेली पॅकेजेस आधीच्या धोरणांत सुरू आहेत. त्याची अंमलबजावणी कशी होईल आणि वेळेत या निधीचे वितरण कसे केले जाईल हे सरकारने स्पष्ट केले पाहिजे.

संकलन, संपादन - अक्षय शितोळे

First published: May 18, 2020, 8:16 PM IST

ताज्या बातम्या