Home /News /maharashtra /

मोठी बातमी, शरद पवार घेणार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट

मोठी बातमी, शरद पवार घेणार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट

शरद पवार यांच्यासह काही नेते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची 9 डिसेंबर रोजी दिल्लीत भेट घेणार आहे. ही भेट कृषी कायदा विरोधाच्या संदर्भात असणार आहे.

मुंबई,06 डिसेंबर : कृषी कायद्यावरून (farm act-2020) देशभरात शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. दिल्लीच्या सीमेवर पंजाब आणि हरियाणाच्या शेतकरी आंदोलन करत आहे. आता राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनीही पुढाकार घेतला आहे. दोन दिवसांत शरद पवार हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांची भेट घेणार आहे. शरद पवार यांच्यासह काही नेते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची 9 डिसेंबर रोजी दिल्लीत भेट घेणार आहे. ही भेट कृषी कायदा विरोधाच्या संदर्भात असणार आहे. कृषी कायद्याविरोधात शरद पवार हे राष्ट्रपतींकडे नवी भूमिका मांडणार असल्याची शक्यता आहे. काही क्षणात सराफ-मोबाईल दुकानं जळून खाक, कॉम्प्लेक्समधील आगीचा पाहा VIDEO शरद पवार यांनी आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी निवासस्थानी जाऊन तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत असताना कृषी विधेयकाविरोधातील आंदोलनावरून मोदी सरकारला सल्लावजा टोला लगावला. 'पंजाब आणि हरियाणाचा शेतकरी हा रस्त्यावर उतरला आहे. याचे गांभीर्य सरकारने घेतले पाहिजे. पण दुर्दैवाने या आंदोलनाची अशी दखल घेतली नसल्याचे दिसून आले आहे. जर असंच राहिले तर हे आंदोलन फक्त दिल्लीपुरते मर्यादित राहणार नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकं शेतकऱ्याच्या आंदोलनात पाठिशी उभे राहतील आणि प्रश्नाची सोडवणूक आपल्या पद्धतीने करतील. त्यामुळे मोदी सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी, असा सल्ला शरद पवारांनी दिला. ‘या’ निवडणुकीनंतर नितीश सरकार पडणार; माजी मंत्र्यांनी सांगितला मुहूर्त तसंच, 'ज्या वेळी हे विधेयक मांडण्यात आले होते. मी त्यावेळीही कुणाचे न ऐकता निर्णय घेण्यात आला. त्यावेळी लोकसभेत विधेयकावर चर्चा करण्यात आली नाही. घाईघाईने विधेयकाचा निर्णय घेण्यात आला होता. आता त्याचे परिणाम मोदी सरकारला भोगावे लागणार आहे' असा इशाराही पवारांनी दिली. दरम्यान, दुसरीकडे अकाली दलाचे नेते मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांच्या भेटीला आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी भेट घेणार आहे.   कृषी कायदा विरोधात भूमिकेला शिवसेनेन पाठिंबा द्यावा, अशी मागणी अकाली दलाचे नेते करणार असल्याची माहिती मिळतेय.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या