शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार निवेदन

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Aug 16, 2019 01:58 PM IST

शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार निवेदन

मुंबई, 16 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पूरपरिस्थिती संदर्भात निवदन देण्यासाठी 20 ऑगस्टला ही भेट होणार आहे.

पूरग्रस्तांना मदत करण्यासंदर्भात तसंच त्यांचं योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्यासंदर्भात काही मागण्यांचे निवेदन यावेळी राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांकडे देण्यात येणार आहे. यावेळी शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

काय असणार राष्ट्रवादीच्या निवेदनात?

अनेकदा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद आणि देशाचं कृषीमंत्रिपद भूषवलेल्या शरद पवार यांना आपत्ती व्यवस्थापनाचा चांगला अनुभव आहे. त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्रातील या पूरग्रस्तांचं पुनर्वसन करताना कोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत, याबाबत निवेदनातून माहिती देण्यात येणार आहे.

पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी सरकारची घोषणा

Loading...

पश्चिम महाराष्ट्रातल्या पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारने केंद्राकडे जी मदत मागितली आहे, त्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारने प्रत्येक कुटुंबाला 5000 द्यायला सुरुवात केली आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. ज्यांची घरे पडली आहेत त्यांना राज्य आणि केंद्र सरकारमार्फत साडेतीन लाख रुपये देण्यात येणार असल्याची घोषणाही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांना मागील आठवड्यात पुराचा मोठा फटका बसला. या भागातील पुराचं पाणी आता मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. असं असलं तरीही पुरामध्ये अनेकांची घरं पडली आहेत. तसंच पशुधनाचं मोठं नुकसान झालं आहे. या सर्व परिस्थितीबद्दल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माहिती देत पूरग्रस्तांना मदतीची घोषणा केली आहे.

VIDEO : स्वातंत्रदिनी ऐका संत तुकडोजी महाराजांनी लिहिलेली राष्ट्रवंदना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 16, 2019 01:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...