'...तोपर्यंत चौकशीसाठी येऊ नये', ED कडून शरद पवारांना विनंती

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Sep 27, 2019 09:25 AM IST

'...तोपर्यंत चौकशीसाठी येऊ नये', ED कडून शरद पवारांना विनंती

विवेक गुप्ता, 27 सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. मात्र शरद पवार यांची जेव्हा चौकशी करायची असेल तेव्हा त्यांना समन्स बजावण्यात येईल. त्यामुळे जोपर्यंत चौकशीसाठी बोलावण्यात येत नाही तोपर्यंत येऊ नये, अशी विनंदी ईडीने शरद पवार यांना केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

शरद पवार मात्र ईडी कार्यालयात जाण्याबाबत ठाम आहेत. त्यामुळे दुपारी 2 वाजता ते ईडीच्या कार्यालयात जातील. या पार्श्वभूमीवर फोर्ट परिसरात 144 कलाम लागू करण्यात आलं आहे. शरद पवारांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ईडी कार्यालयासमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. त्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

शरद पवारांकडून कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन

'ईडी कार्यालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये. ईडी कार्यालयाच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच तेथे शांतता राखली जाईल याची काळजी घ्यावी,' असं आवाहन शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे.

Loading...

अण्णा हजारेंकडून पवारांना क्लिनचीट

भ्रष्टाचाराच्या विरोधात अण्णा हजारे ठामपणे उभे राहतात. अण्णा हजारेंनी आतापर्यंत भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून अनेक नेत्यांना जेलवारी घडवली. मात्र पहिल्यांदाच अण्णा हजारेंनी शरद पवार यांची पाठराखण करत त्यांना क्लिनचीट दिली आहे. अण्णांनी दिलेल्या पुराव्यांच्या आधारे सरकार आणि सरकारी यंत्रणा कामाला लागतात, हा नेहमीचा अनुभव आहे. तर दुसरीकडे ईडीनं गुन्हा दाखल केल्यानं शरद पवार अडचणीत आलेत. राज्य सहकारी बँकेतल्या घोटाळ्याप्रकरणी अण्णा हजारेंनी पुरावे सादर केले होते. मात्र त्या पुराव्यांमध्ये शरद पवार यांचं नावच नसल्याचं खुद्द अण्णा हजारे यांनी स्पष्ट केलं.

SPECIAL REPORT : लोकं आता 'हे' गाव सोडून चालले, सरकार आता तरी लक्ष्य देईल का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 27, 2019 08:29 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...