शरद पवारांनी मृत्यूदराबाबत व्यक्त केली चिंता, म्हणाले धोकादायक शहरामध्ये सोलापुरचा समावेश

शरद पवारांनी मृत्यूदराबाबत व्यक्त केली चिंता, म्हणाले धोकादायक शहरामध्ये सोलापुरचा समावेश

मुंबई, जळगाव सुधारले. मात्र सोलापूर सुधारले नाही, असं राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं.

  • Share this:

सोलापूर, 19 जुलै: देशातील धोकादायक शहरामध्ये सोलापूरचा समावेश होतो. सोलापूरचा मृत्यूदर काळजी करण्यासारखा

आहे. राज्यातील मृत्यूदरापेक्षा सोलापूरचा मृत्यूदर जास्त आहे. मुंबई, जळगाव सुधारले. मात्र सोलापूर सुधारले नाही, असं राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. नियोजन भवनात शरद पवार यांच्या उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. बैठकीस राजेश टोपे, दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, महापौर, आमदार भारत नाना भालके, प्रणिती शिंदे, खासदार ओमराजे निंबाळकर, राजेंद्र राऊत, बबनदादा शिंदे आदी उपस्थित होते. त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं.

हेही वाचा.. चिंता करू नका, लवकरच निर्णय घेऊ; परीक्षांबाबत उच्चशिक्षण मंत्र्यांचा मोठा खुलासा

शरद पवार म्हणाले की, काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदेंचा मला फोन आला. माझ्या मतदारसंघातील परिस्थिती बिकट आहे, त्या म्हणाल्या होत्या. त्यामुळे बैठक घेतली. सोलापूरचे आणि माझे ऋणानुबंध आहेत. मी शहराचे काही देणे लागतो म्हणून मी येथे आलो.

देशातील धोकादायक शहरामध्ये सोलापूरचा समावेश होतो. राज्यातील मृत्यूदरापेक्षा सोलापूरचा मृत्यूदर जास्त असून तो काळजी करण्यासारखा असल्याचं पवार यांनी यावेळी सांगितलं. बार्शी, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्यातील परिस्थिती गंभीर आहे. या तीन तालुक्यात जाऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा, अशा सूचना आरोग्य मंत्र्यांना सुचना दिल्या आहेत तसेच मुख्य सचिव अजोय मेहता यांना 21 किंवा 22 तारखेला सोलापूरला पाठवणार आहे. तेही सोलापूर आणि बार्शीचा दौरा करतील. परिस्थितीचा आढावा घेतील. सोलापूर जिल्हा हा आपत्तीवर मात करणारा जिल्हा आहे. स्वातंत्र्यापूर्वी सोलापूर शहराने ब्रिटीशांना काही काळाच हकलून लावलं होतं. ब्रिटिशांवर मात केली त्यामुळे कोव्हिडवर नक्की मात करेल, असा विश्वास देखील शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा......आणि शरद पवारांनी 87 वर्षांच्या 'तरुण' कार्यकर्त्यासाठी थांबवला ताफा, पाहा हा VIDEO

शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे...

- राज्य आणि केंद्र सरकारकडून काही मदत मिळतेय का ते पाहणार

- सोलापूरमध्ये अधिक कर्मचारी नेमणे आवश्यक आहे

-मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांच्या कानावर गोष्ट घालून सोलापूरला अधिकची मदत देणार

- शहराच्या पूर्व भागात विडी कामगार, हातमाग कामगार आहे त्यामुळे तेथे रुग्ण वाढलेत

- त्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे त्यामुळे फैलाव वाढतोय

- खासगी रुग्णालयातील रुग्णांचे बील आमचे ऑडिटर तपासणार

- बील व्यवस्थित दिले जात आहेत का ते तपासणार

- IMA च्या डॉक्टरांना कोव्हिड सेंटरला सेवा देतील

- शरद पवारांना ८० रेमडीसीव्हिर इंजेक्शन आज दिलेत

- टेली ICU सोलापुरात सुरु करण्यात येईल

- दिल्लीचे डॉक्टर येथील रुग्णांना उपचार देतील

- शहरातील ॲंटीजीन टेस्ट सुरु केल्यात

Published by: Sandip Parolekar
First published: July 19, 2020, 5:30 PM IST

ताज्या बातम्या