शरद पवार यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात

शरद पवार यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ताफ्यातील एका वाहनाला अपघात झाला आहे.

  • Share this:

प्रशांत मोहिते, नागपूर, 14 नोव्हेंबर : नागपूर जिल्ह्यातील भारसिंगी वरून खापाकडे जाताना जामगावजवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ताफ्यातील एका वाहनाला अपघात झाला आहे. शरद पवार यांची गाडी अपघाताच्या वेळी लांब असल्याने शरद पवार हे पूर्णपणे सुखरूप आहेत.

शरद पवार हे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेत आहे. यावेळी जामगावजवळ पवार यांच्या ताफ्यातील एका गाडीने बाईकस्वाराला जोरदार धडक दिली. या घटनेत बाईकस्वार गंभीर जखमी झाला असून बाईकचेही नुकसान झाले आहे.

बाईकस्वाराला धडक देणारी बोलेरो ही गाडी ताफ्यात शरद पवार यांच्या वाहनाच्या 4 ते 5 वाहन मागे चालत होती. अचानक ब्रेक लागल्यामुळे ही दुर्घटना झाली असे सांगितले जात आहे. पवार यांच्या ताफ्यातील एम्बुलन्स ध्ये जखमी तरुणाला लगेच जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये अनेक राजकीय नेत्यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात घडल्याच्या घटना घडल्या आहेत. 6 नोव्हेंबरला भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. सुजय विखे यांना सुरक्षा देणार्‍या पोलीस वाहनाचा मोठा अपघात झाला होता. पारनेर तालुक्यातील गारखिंड घाटात गाडीला अपघात झाला होता.

दुसरीकडे, 7 नोव्हेंबरला काँग्रेसचे कार्याध्यक्ष विश्वजित कदम यांच्या गाडीला पुण्यात अपघात झाला. या अपघातातून विश्वजित कदम थोडक्यात बचावले. विश्वजीत कदम यांना अपघातात कोणतीही गंभीर इजा झाली नव्हती.

दोन हॉटेल मालकांमध्ये तुफान हाणामारी, पाहा VIDEO

Published by: Akshay Shitole
First published: November 14, 2019, 2:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading