कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी केली PM मोदींकडे विशेष मागणी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी केली PM मोदींकडे विशेष मागणी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष आवाहन केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 21 मार्च : कोरोना व्हायरसने जगभरातील तब्बल 176 देशांमध्ये धुमाकूळ घातला आहे. भारताचाही कोरोनाबाधित देशांमध्ये समावेश आहे. त्यामुळे देशातील जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष आवाहन केलं आहे.

'जीएसटी परतावा करण्याची मुदत महाराष्ट्रामध्ये 22 मार्चला संपत आहे आणि भारतातील इतर भागांमध्ये याच आसपास ही मुदत संपत आहे. तसंच आयकर भरण्याची तारीखही 31 मार्च रोजी संपत आहे. कोरोना आणि त्यामुळे तयार झालेली लॉकडाउनची स्थिती लक्षात घेत आपण सर्व प्रकारचा परतावा भरण्याची मुदत किमान एक महिन्याने वाढवावी. तसंच यासाठी कोणत्याही प्रकारचा दंड करू नये,' असं आवाहन शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींकडे केलं आहे.

भारतातील संख्या वेगाने वाढली!

भारतात (India) कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) वेगाने पसरतो आहे. फक्त 24 तासांत तब्बल 98 रुग्ण आढळलेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 298 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 63 रुग्ण आहेत.देशातील कोरोनाव्हायरसचे एकूण 298 रुग्ण असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य

मंत्रालयाने दिली आहे.

दिवसेंदिवस कोरोनाव्हायरसच्या रुग्णांचा आकडा वाढतो आहे. शुक्रवारी कोरोनाव्हायरसच 50 रुग्ण आढळले होते. मात्र शनिवारी तब्बल 98 रुग्ण आढळलेत. फक्त 24 तासांतच रुग्णाची संख्या दुप्पट झाली आहे.

First published: March 21, 2020, 6:35 PM IST

ताज्या बातम्या