Home /News /maharashtra /

'कोरोना व्हायरसची लढाई आपण जिंकणारच आहोत, पण...', शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

'कोरोना व्हायरसची लढाई आपण जिंकणारच आहोत, पण...', शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातील जनतेला आवाहन केले आहे.

    मुंबई, 23 मार्च : 'कोरोना व्हायरसविरुद्धची (coronavirus) लढाई आपण जिंकणारच आहोत परंतु गरज आहे संयम, समंजसपणा आणि योग्य त्या दक्षता घेण्याची. मला विश्वास आहे याची गांभीर्याने दक्षता घ्याल,' असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातील जनतेला आज केले आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता राज्य आणि केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाची गांभीर्याने नोंद घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. राज्यात जमावबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु अजूनही अनेक शहरात व काही ठिकाणी लोकं रस्त्यावर घोळक्यांनी बघायला मिळत आहे याबाबत शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली. 'इतर देशात गंभीर स्थिती आहे त्या स्थितीची गांभीर्याने नोंद घेऊन नागरिकांनी दक्षता घेतली आहे. कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आपणही गांभीर्याने घ्यायची गरज आहे,' असेही शरद पवार यांनी सांगितले. दरम्यान, अतिशय गरज असेल तरच घराबाहेर पडा. नाहीतर घराबाहेर पडू नका. केंद्र व राज्य सरकारने जे आवाहन केले आहे त्याची गांभीर्याने नोंद घ्यावी व सरकारी यंत्रणेला पुर्णपणे सहकार्य करावे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. 'आपण सगळेजण धन्यवादाला पात्र आहोत' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या जनता कर्फ्यूला लोकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल शरद पवार यांनी समाधान व्यक्त केलं होत. 'विश्वातल्या संपूर्ण जनतेवर कोरोनाचं महाभयंकर संकट आलेलं आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सामूहिक आणि व्यक्तिगत पातळीवर आपण एकजुटीने कारवाई करण्याची आवश्यकता आहे. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी संपूर्ण देशात आपले दैनंदिन व्यवहार पूर्णपणे थांबवण्याचं आवाहन केलं. त्याला देशातल्या कानाकोपऱ्यातील लोकांनी प्रतिसाद दिला. तो प्रतिसाद पाहिल्यानंतर आपण सगळेजण धन्यवादाला पात्र आहोत,' असं शरद पवार म्हणाले. परंतु इथेच समाधान मानून चालणार नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी 31 मार्चपर्यंत पूर्णपणाने अशाच प्रकारची भूमिका घेण्याचं सुचवलेलं आहे त्याला आपण सगळेजण साथ देऊ या. आणि सर्वसामान्य माणसाला यातून वाचवण्यासाठी प्रयत्न करूया, असं आवाहनही पवार यांनी केलं आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: NCP, Sharad pawar

    पुढील बातम्या