उदयनराजेंच्या भाजप प्रवेशानंतर शरद पवार पहिल्यांदाच साताऱ्यात, होणार जोरदार स्वागत

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशानंतर शरद पवार पहिल्यांदाच साताऱ्यात, होणार जोरदार स्वागत

शरद पवार साताऱ्यात दाखल झाल्यनंतर त्यांच्या जंगी स्वागतासाठी भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे.

  • Share this:

सातारा, 22 सप्टेंबर : उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादीच्या साताऱ्याच्या बालेकिल्ल्यात पडझड झाली. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पहिल्यांदाच सातारा दौऱ्यावर येत असून त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी करण्यात आली आहे.

शरद पवार साताऱ्यात दाखल झाल्यनंतर त्यांच्या जंगी स्वागतासाठी भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. त्यांनतर राष्ट्रवादीचा मोठा मेळावाही होणार आहे. या मेळाव्यात पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष दीपक पवार हे भाजपला रामराम करत आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत.

राजेंच्या भाजप प्रवेशावर काय बोलणार पवार?

लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांना तिकीट देण्यास साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांचा विरोध होता. मात्र पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सर्वांचा विरोध डावलून उदयनराजेंना पुन्हा एकदा लोकसभेची उमेदवारी दिली. या निवडणुकीत उदयनराजेंचा विजयही झाला. मात्र त्यानंतर आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उदयनराजेंनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला.

दुसरीकडे, साताऱ्यातील राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली. लोकांचे प्रश्ने सोडवण्यासाठी सत्तेच्या बाजूने जाणं गरजेचं आहे, असं म्हणत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. साताऱ्यातील दोन राजेंनी पक्ष सोडल्यानंतर जिल्ह्यात राष्ट्रवादीला खिंडार पडल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर आता शरद पवार पहिल्यांदाच साताऱ्याच्या दौऱ्यावर जात आहेत. पवारांच्या दौऱ्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला आहे. त्यामुळे उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंच्या भाजप प्रवेशाचा शरद पवार नक्की कसा समाचार घेणार, हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.

VIDEO: 'लफडी केली तर सहन करा'; राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांची पवारांनी घेतली फिरकी

Published by: Akshay Shitole
First published: September 22, 2019, 10:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading