निर्णायक बैठकीआधी शरद पवारांनी स्पष्ट केली दिशा

निर्णायक बैठकीआधी शरद पवारांनी स्पष्ट केली दिशा

बैठकीआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निर्णयाबाबतचे संकेत दिले आहेत.

  • Share this:

मुंबई, 11 नोव्हेंबर : सत्तास्थापनेवरून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रित केल्यानंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कारण या दोन्ही पक्षांच्या मदतीशिवाय शिवसेनेला बहुमताचा जादुई आकडा गाठणं शक्य नाही. या पार्श्वभूमीवर निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादीची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत होत आहे. या बैठकीआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निर्णयाबाबतचे संकेत दिले आहेत.

फक्त राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर शिवसेनेला बहुमताचा जादुई आकडा गाठता येणार नाही. त्यामुळे काँग्रेसचीही भूमिका निर्णायक ठरणार आहे. मात्र काँग्रेसचं हायकमांड आत्तापर्यंत कोणत्याही निर्णयापर्यंत आल्याचं दिसत नाही. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. 'काँग्रेस आणि राष्ट्रवादी चर्चा करून एकत्र निर्णय घेईल,' असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेची शेवटच्या क्षणी कोंडी?

भाजपने सत्ता स्थापनेसाठी दावा करणार नसल्याचं सांगितल्यानंतर शिवसेनेला राज्यपालांनी आमंत्रण दिलं आहे. त्यासाठी सोमवारी संध्याकाळी 7.30 वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. सेनेला राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या पाठिंब्याशिवाय सरकार स्थापन करता येणं शक्य नाही. यातच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या एका वक्तव्याने शिवसेना कोंडीत सापडली आहे.

शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं अजून काही ठरलेलं नाही असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं. याबाबतचा निर्णय कोअर कमिटीच्या बैठकीनंतर आघाडीचे नेते एकत्र मिळून घेतील असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं. तसंच पाठिंबा देण्याबाबात शिवसेनेला कोणत्याही प्रकारची अट नव्हती असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

सत्तासंघर्षात भाजपकडून नवी खेळी; संजय राऊत यांचा गंभीर आरोप, पाहा UNCUT VIDEO

Published by: Akshay Shitole
First published: November 11, 2019, 12:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading