राजकीय भूकंपाची चर्चा सुरू असतानाच शरद पवारांकडून मोठा खुलासा

राजकीय भूकंपाची चर्चा सुरू असतानाच शरद पवारांकडून मोठा खुलासा

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

  • Share this:

विनया देशपांडे, मुंबई, 1 नोव्हेंबर : महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी भाजप आणि शिवसेनेत मोठा संघर्ष सुरू आहे. अशातच 'आम्हीही बहुमताचा आकडा गाठू शकतो. आता लिहून घ्या, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार,' अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत गेल्या अनेक दिवसांपासून माझं बोलणं झालेलं नाही. फक्त आम्ही 3 महिन्यांपूर्वी संसदेत बोललो होतो. काँग्रेसने यापूर्वीच स्पष्ट भूमिका घेतली आहे की आम्ही भाजप आणि शिवसेनेसोबत जाणार नाही. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी दुसऱ्या कोणाशी हातमिळवणी करण्याची शक्यता नाही,' असं CNN News18 सोबत बोलताना शरद पवार यांनी म्हटलं आहे.

'मतमोजणीच्या दिवशी मला सोनिया गांधी यांचा फोन आला होता. पण त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी कोणतंही संभाषण नाही. आमच्यामध्ये देशातील आर्थिक अस्थिरतेबाबत चर्चा झाली आहे. त्याबाबतच मी 3 नोव्हेंबरला दिल्लीला जाणार आहे,' अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे.

शरद पवार यांनी शिवसेना किंवा भाजपला पाठिंबा देण्याची चर्चा नाकारल्याने पुन्हा एकदा राजकीय समीकरणं बदलली आहेत. तसंच आपला मुख्यमंत्री करण्याच्या शिवसेनेच्या महत्त्वाकांक्षेलाही धक्का बसला आहे. त्यामुळे आगामी काळात शरद पवार नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला आहे. 'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार आहे. शिवसेना बहुमत सिद्ध करू शकते. अहंकार भल्याभल्यांना घेऊन बुडतो,' असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

VIDEO: निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2019 10:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading