PM मोदींची डोकेदुखी वाढवण्यासाठी पवारांचा प्लॅन तयार, फक्त आहे 'हा' एक अडथळा

PM मोदींची डोकेदुखी वाढवण्यासाठी पवारांचा प्लॅन तयार, फक्त आहे 'हा' एक अडथळा

शभरात चौफेर उधळत असलेला भाजपचा वारू महाराष्ट्रात रोखला गेल्याने देशाचं लक्ष महाराष्ट्राकडे वेधलं गेलं आहे.

  • Share this:

मुंबई, 10 डिसेंबर : महाराष्ट्रात ऐतिहासिक आघाडीचा प्रयोग करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देशभर चर्चेचा विषय ठरले आहेत. देशभरात चौफेर उधळत असलेला भाजपचा वारू महाराष्ट्रात रोखला गेल्याने देशाचं लक्ष महाराष्ट्राकडे वेधलं गेलं आहे. हाच प्रयोग देशभर करण्यास शरद पवार उत्सुक असल्याचं दिसत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमुळे गेल्या काही वर्षात देशात विरोधकांची अवस्था दयनीय झाली आहे. मोदी सरकारने घेतलेले नोटबंदी आणि जीएसटीसारखे अनेक निर्णय वादग्रस्त ठरले. मात्र हे मुद्दे लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहचवण्यात विरोधी पक्ष अपयशी ठरले. त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला अभूतपूर्व यश मिळालं. त्यामुळे मोदींचा पराभव करायचा असल्यास काय करायला हवं, याविषयी नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत शरद पवार यांनी भाष्य केलं होतं.

महाष्ट्रातील ऐतिहासिक प्रयोगानंतर देशपातळीवर सर्व विरोधक एकत्र आले तर भाजपची घोडदौड रोखू शकतो अशी भावना व्यक्त केली जात आहे. मात्र त्या प्रमाणं प्रयत्न होताना दिसत नाहीत. असं वातावरण असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदींना आज देशात पर्याय पाहिजे आहे. मात्र त्यांना पर्याय उभा करण्यात विरोधी पक्षांना अपयश आलं आहे,' असं शरद पवार म्हणाले.

हेही वाचा - भाजप सोडण्याची चर्चा सुरू असतानाच पंकजा मुंडेंनी समर्थकांना केलं आवाहन

'जोपर्यंत पर्याय उभा केला जात नाही तोपर्यत बदल घडणार नाही. मोदींपेक्षा हा नेता उजवा आहे, काहीतरी करून दाखवणारा आहे हे जोपर्यंत ठळकपणे दिसत नाही तोपर्यंत लोक तो पर्याय स्वीकारणार नाहीत. असा पर्याय उभा करण्यात विरोधकांना यश आलं नाही,' असं शरद पवार यांनी मान्य केलं आहे. पण त्याचवेळी पर्याय निर्माण केला तर त्याला पाठिंबा मिळतो हे मी अनुभवलं आहे असं म्हणत शरद पवार यांनी आपले इरादे स्पष्ट केलं आहेत.

नरेंद्र मोदी यांच्याविरोधात स्वत: मैदानात उतरले नाहीत तरी शरद पवार हे देशभरातील विरोधी पक्षांची मोट बांधू शकतात, असं राजकीय निरीक्षक सांगतात. स्वत: शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी या आशयाचा विधान केलं होतं. मात्र अशी मोट बांधण्यासाठी आणि ती यशस्वी करण्यासाठी शरद पवार यांना महाराष्ट्रातच मोठं आव्हान आहे. कारण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी अशा अनोख्या आघाडीचं सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार पूर्ण पाच वर्ष चालवण्यात शरद पवार यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे देशभर जर मोदीविरोधकांना एकत्र आणून नवा पर्याय द्यायचा असल्यास शरद पवार यांना महाराष्ट्रातील ठाकरे सरकार आपला कार्यकाळ व्यवस्थित पूर्ण करेन, याची काळजी घ्यावी लागेल. महाराष्ट्रातील प्रयोगाच्या यशावरच देशातील संभाव्य आघाडीचं भवितव्य ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 10, 2019 11:52 AM IST

ताज्या बातम्या