मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /सीरम संस्थेत अपघात की घातपात? शरद पवार म्हणाले...

सीरम संस्थेत अपघात की घातपात? शरद पवार म्हणाले...

21 जानेवारी रोजी पुण्यातील हडपसर परिसरातल्या सीरम इन्स्टिट्यूटच्या प्लांटपैकी नव्या सहा मजली इमारतीला आग लागली होती.

21 जानेवारी रोजी पुण्यातील हडपसर परिसरातल्या सीरम इन्स्टिट्यूटच्या प्लांटपैकी नव्या सहा मजली इमारतीला आग लागली होती.

21 जानेवारी रोजी पुण्यातील हडपसर परिसरातल्या सीरम इन्स्टिट्यूटच्या प्लांटपैकी नव्या सहा मजली इमारतीला आग लागली होती.

कोल्हापूर, 22 जानेवारी : कोरोनावर लस निर्माण करणाऱ्या पुण्यातील सीरम इनस्टिट्यूटमध्ये (Pune Serum Institute Fire) आग लागली होती. या दुर्घटनेत  5 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सीरम संस्थेत लागलेल्या आगीवरून संशयाचा धूर निर्माण झाला आहे. परंतु, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना घातपाताची अशी कोणतीही शक्यता नाही, असं ठाम मत व्यक्त केले आहे.

शरद पवार हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहे.  पत्रकारांशी बोलत असता सीरम संस्थेत आग लागली या मागे घातपात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे, असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला होता.

या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की,'आज आपण असे बोलणे योग्य नाही. सीरम संस्था आणि तिथे काम करणाऱ्या सर्व संशोधकांवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. ही घटना पूर्णपणे अपघात आहे', असं पवार यांनी ठामपणे सांगितले.

तसंच, 'सीरम ही जगमान्य संस्था आहे. सीरम संस्थेनं कोरोनावर पर्याय शोधण्यात यश मिळवले आहे. सीरम संस्थेत  आग लागली. ज्या ठिकाणी लस तयार होत आहे, त्या जागेपासून ५ किमी अंतरावर ही घटना घडली आहे', असंही पवार म्हणाले.

21 जानेवारी रोजी पुण्यातील हडपसर परिसरातल्या सीरम इन्स्टिट्यूटच्या प्लांटपैकी नव्या सहा मजली इमारतीला आग लागली. अंदाज असा होता की 4 लोक अडकले आहेत. ही माहिती मिळताच पुणे अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या. त्यांनी या लोकांची तातडीने सुखरूप सुटका केली. त्यानंतर आग विझवण्याचं काम सुरू झालं. या इमारतीत वरच्या मजल्यावर कोणी असल्याची माहितीच नव्हती. हा मजला जळून खाक झाला होता. आग विझल्यानंतर त्या ठिकाणी कर्मचारी पोहोचले असता 5 जण मृत्युमुखी पडल्याचं लक्षात आलं. मृतदेह ससून रुग्णालयात पोहोचवण्यात आले आहेत.

ही आग वेल्डिंगच्या कामादरम्यान लागल्याचं सांगण्यात येत आहे. पण आग नेमकी कशी लागली याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आगीच्या घटनास्थळाची मुख्यमंत्री करणार पाहणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सीरम इन्स्टिट्यूटच्या प्लांटला लागलेल्या आगीसंदर्भात अदर पुनावाला यांच्याशी बोलले असून आज शुक्रवार 22 जानेवारी रोजी दुपारी पुणे येथे प्रत्यक्ष आग लागलेल्या युनिटच्या ठिकाणी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहेत.

दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने पुण्याकडे रवाना होतील. साडेतीनच्या सुमारास हडपसर परिसरातील सीरमच्या आग लागलेल्या प्लांटला भेट देतील व पाहणी करतील.

First published:
top videos