Home /News /maharashtra /

युतीची अजूनही सत्तेची गणितं जुळवणं सुरू असतानाच शरद पवार पुन्हा अॅक्शन मोडमध्ये

युतीची अजूनही सत्तेची गणितं जुळवणं सुरू असतानाच शरद पवार पुन्हा अॅक्शन मोडमध्ये

एकीकडे युतीची नेतेमंडळी स्पष्ट बहुमत मिळूनसुद्धा अजून सत्तास्थापनेची गणितं जुळवण्यात मश्गुल असताना शरद पवारांनी पुढच्या दौऱ्याची तयारी सुरू केली आहे.

    प्रफुल्ल साळुंखे, सागर कुलकर्णी मुंबई, 31 ऑक्टोबर : महाराष्ट्राच्या राजकारणात भाकरी फिरवणारे म्हणून ओळख असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची निवडणुकीनंतरची दिशा ठरलीसुद्धा. एकीकडे युतीची नेतेमंडळी स्पष्ट बहुमत मिळूनसुद्धा अजून सत्तास्थापनेची गणितं जुळवण्यात मश्गुल असताना शरद पवारांनी पुन्हा एकदा पुढच्या दौऱ्याची तयारी सुरू केली आहे. 80 वर्षांच्या वयात तरुणाच्या दमाने महाराष्ट्र पिंजून काढत शरद पवार यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं रणांगण गाजवलं होतं. वादळ-पावसाची तमा न बाळगता त्यांनी केलेल्या झंझावाती दौऱ्यामुळे अनेकांनी जुळवून आणलेली गणितं चुकली, हे निवडणूक निकालावरून दिसलं. आता पवार पुढच्या तयारीला लागले आहेत. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या मराठवाड्यात ते पाहणी दौरा करणार आहेत. त्यांच्याबरोबर धनंजय मुंडेसुद्धा असतील. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल 24 ऑक्टोबरला जाहीर झाले. जनतेने भाजप- शिवसेना महायुतीला कौल दिलेला असला, तरी त्यांना अपेक्षेइतक्या जागा मिळाल्या नाहीत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची खऱ्या अर्थाने सरशी झाली, असं म्हटलं गेलं. वाचा - 'पाच वर्षांसाठी एकच CM हवा'; महायुतीमधील नेत्याच्या भूमिकेमुळे शिवसेना बॅकफूटवर! अजूनही नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झालेला नाही, कारण सत्तावाटपाचं भिजत घोंगडं तसंच आहे. शिवसेना, भाजप सत्तास्थापनेची गणितं जुळवत असताना काँग्रेसनेही विधीमंडळ नेतेपदाची नेमणूक अद्याप केलेली नाही. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने आपला गटनेता म्हणून अजित पवार यांची निवड केली आणि आजपासून शरद पवार पुढच्या कार्यक्रमांच्या तयारीलाही लागले, असं चित्र आहे. वाचा - प्रकाश आंबेडकरांना उत्तर देण्यासाठी काँग्रेसचा नवा प्लॅन पुढच्या काळातली राजकारण आणि समाजकारणाची गणितं ओळखत शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौरा नियोजित केला आहे. 6 नोव्हेंबरला पवार परभणीत नुकसान पाहणी दौरा करतील, अशी माहिती आहे. राज्यात परतीच्या पावसाने मोठं नुकसान केलं. शेतकऱ्यांच्या हातात आलेलं पीक गेलं. शिवाय वीज पडूनही अनेक जीव गेले. या सगळ्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पवार मराठवाडा दौरा करत आहेत. ते नंतर तळकोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचाही दौरा करण्याची शक्यता आहे. बुधवारी म्हणजे 6 तारखेला परभणी,  हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करणार असून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे  त्यांच्यासोबत या दौर्‍यात असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे मराठवाड्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची येत्या बुधवारी पाहणी करणार आहेत. यावर्षी परतीच्या पावसामुळे मराठवाड्यातील नव्हे तर संपूर्ण राज्यातील  शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.  ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून त्यांना धीर देण्यासाठी स्वतः पवार साहेब हे येत्या बुधवार दिनांक सहा नोव्हेंबर रोजी मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. बुधवार दिनांक 6 रोजी  दुपारी बारा वाजता ते सर्वप्रथम सेलू व परिसरातील नुकसानीची पाहणी करतील त्यानंतर परभणी व परिसरातील व त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील वसमत भागातील नुकसानीची पाहणी करणार आहेत. ------------------------------------- अन्य बातम्या सत्ता वाटणीसाठी CM आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली, मनोहर जोशींचा गौप्यस्फोट चक्क अनिल कपूरला मुख्यमंत्रिपदाची ऑफर, नायकानं दिलं हे उत्तर! 1 नोव्हेंबरपासून बदलणार बँकांचे नियम, तुमच्यावर होणार थेट परिणाम
    Published by:Arundhati Ranade Joshi
    First published:

    Tags: Maharashtra Assembly Election 2019, Maharashtra rain, NCP, Parbhani, Sharad Pawar (Politician)

    पुढील बातम्या