शरद पवारांची मुख्यमंत्र्यांवर विखारी टीका, कुस्तीच्या आव्हानावर केला पलटवार

शरद पवारांची मुख्यमंत्र्यांवर विखारी टीका, कुस्तीच्या आव्हानावर केला पलटवार

राष्ट्रवादीच्या प्रचारसभेत शरद पवार यांनी सत्ताधारी भाजपचा जोरदार समाचार घेतला.

  • Share this:

सागर सुरवसे, सोलापूर, 12 ऑक्टोबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'मुख्यमंत्री म्हणतात आम्ही तयार आहोत, पण कुस्ती करायला समोर कुणीच राहिलं नाही. पण कुस्ती ही पैलवानांसोबत करायची असते. या असल्यांसोबत नाही,' असा टोला मुख्यमंत्र्यांना लगावत शरद पवारांनी पलटवार केला आहे. यावेळी पवारांनी काही हातवारेही केले.

बार्शी इथं आयोजित राष्ट्रवादीच्या प्रचारसभेत शरद पवार यांनी सत्ताधारी भाजपचा जोरदार समाचार घेतला. यावेळी शिवस्मारक, गड किल्ले भाड्याने देण्याचा मुद्दा आणि कलम 370 यावरून त्यांनी मुख्यमंत्र्यांसह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनाही लक्ष्य केलं.

'शिवरायांच्या गडकिल्ल्यावर छमछम होणार?'

'मागील वेळी भाजपने घोषणा केली की, शिवछत्रपतींचा आशीर्वाद घेऊन राज्य चालवू. पण अरबी समुद्रात एक विटही उभी केली नाही. शिवाजी महाराजांच्या नावाने आश्वासन दिले ते खोटे करुन दाखवले. आता जिथे भवानी तलवार चमकली तिथे भाजप सेनेच्या कारकीर्दीत छमछम बघायला मिळणार का,' असं म्हणत शरद पवार यांनी सरकारवर निशाणा साधला.

शरद पवार यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे:

- या सरकारच्या काळात 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या

- मी कृषीमंत्री असताना एक आठवड्यात कर्जमाफी केली.

- हे सरकार ऑनलाईन कर्जमाफी करत आहेत.

- कुटुंबात सगळ्यांनी शेती करणे आता परवडणार नाही.

- कुटुंबातील एकाने नोकरी करावे आणि एकाने शेती करावे.

- बार्शीतील आर्यन कारखाना बंद कशामुळे झाला हे कळलं नाही.

- कारखाने बंद झाल्याने नाशिकमध्ये 10 हजार कामगारांची नोकरी गेली.

- जेट नावाची विमान कंपनी आज बंद झाली. 20 हजार लोकांची नोकरी गेली.

- कारखानदारी, उद्योगधंदे बंद पडत आहेत.

- बेकारांचे तांडे बनविण्यासाठी, कामगारांची चूल बंद करण्यासाठी या सरकारला मत देणार का?

- मुख्यमंत्र्यांच्या गावात गुन्हेगारी वाढलीय मग इतरांचे काय?

- स्वामी चिन्मयानंद हा भाजपचा मंत्री होता. त्यांच्यावर बलात्काराच्या गुन्हा दाखल होतो.

- यांच्यासारखी बेशरम माणसे तुम्हाला मते मागतात.

- जिथे आई, बहिण, मुलीची प्रतिष्ठा ठेवली जात नाही त्यांना आपण मत देता कामा नये.

- 370 कलमाला आमचा पाठिंबा आहे.

- तुम्ही ते कलम रद्द केले त्याचा आनंद आहे.

- 370 कलमावरुन अमित शहा म्हणतात शरद पवार जवाब दो.

- सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त 370 - 370 म्हणत आहेत.

- 370 कलम सांगून लोकांची फसवणूक करत आहेत.

SPECIAL REPORT: तळकोकणातील राजकीय शिमग्यात मुख्यमंत्र्यांची उडी?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 12, 2019 01:49 PM IST

ताज्या बातम्या