मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

गोपीचंद पडळकर यांच्या विखारी टीकेवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

गोपीचंद पडळकर यांच्या विखारी टीकेवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

शरद पवार नेमकी काय प्रतिक्रिया देतात, याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं.

शरद पवार नेमकी काय प्रतिक्रिया देतात, याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं.

शरद पवार नेमकी काय प्रतिक्रिया देतात, याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं.

मुंबई, 26 जून : भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. पडळकर यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने चांगलाच समाचार घेतला तर भाजपनेही पडळकरांचं वक्तव्य चुकीचं असल्याचं सांगितलं. मात्र या सगळ्यात शरद पवार नेमकी काय प्रतिक्रिया देतात, याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं.

पुण्यात खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. ही बैठक संपल्यानंतर माध्यमांकडून शरद पवार यांना गोपीचंद पडळकर यांच्या टीकेविषयी विचारण्यात आलं. त्यावर शरद पवार यांनी पडळकरांना थेट उत्तर देण्याचं टाळलं.

'मला बोलायचं आहे...पण आता नाही...लवकरच सविस्तर बोलेन,' असं म्हणत शरद पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर लगेचच प्रतिहल्ला करण्याचं टाळलं. त्यामुळे आगामी काळात शरद पवार पडळकरांच्या टीकेला नेमकं कसं उत्तर देतात, हे पाहावं लागेल. याबाबत 'TV9 मराठी'ने वृत्त दिलं आहे.

गोपीचंद पडळकरांचं वादग्रस्त वक्तव्य

'शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. राज्याचे नेतृत्त्व त्यांनी केले पण बहुजन समाजातील लोकांवर अन्याय करण्याची त्यांची भूमिका राहिलेली आहे. त्यांच्या कडे कोणतीही विचारधारा नाही. फक्त छोट्या छोट्या समाजाना भडकवायचे आणि त्यांना आपल्या बाजूला करायचे आणि अन्याय करायचा एवढेच काम पवार करत आहेत' अशी जहरी टीका पडळकरांनी केली होती.

धनगर आरक्षण समितीचा पडळकरांना दणका

नगर आरक्षण समितीतून गोपीचंद पडळकर यांना बाजूला करण्यात आले आहे. आज सकाळी वेळापूर येथे धनगर समाज कार्यकर्त्यांची बैठक झाली. धनगर समाजातील नेत्यांनी ही आमदार पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय धनगर आरक्षण लढ्याचे मुख्य प्रवर्तक उत्तम जानकर यांनी घेतला आहे. गोपीचंद पडळकर यांच्या बेताल वक्तव्यामुळे धनगर समाजाची मानहानी झाली आहे. शिवाय आरक्षणाचा मुद्दा ही बाजूला गेला आहे. त्यामुळे अशा बेताल व्यक्त करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पडळकर यांना यापुढे आरक्षण लढ्यात कुठे सहभागी करून घेतले जाणार नसल्याचंही यावेळी जानकर यांनी जाहीर केले.

संकलन, संपादन - अक्षय शितोळे

First published:

Tags: BJP, NCP, Sharad pawar