...म्हणून शरद पवारांना वाटते अमित शहांची काळजी

...म्हणून शरद पवारांना वाटते अमित शहांची काळजी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा खरपूर समाचार घेतला.

  • Share this:

पिंपळगाव, 17 ऑक्टोबर : 'महाराष्ट्राच्या निवडणुकीत मोदी आणि शहा या दोघांच्या तोंडात फक्त कलम 370 आणी शरद पवार ही दोन नावं असतात. अमित शहा यांची तर मला काळजी वाटते. रात्री झोपेतही 370 म्हणत असेल. त्यांची बायको काय म्हणत असेल याची मला चिंता आहे. इथं शेती करणं अवघड झालंय कोण त्या काश्मीरला जाऊन शेती करणार हे मला सांगा?' असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा खरपूर समाचार घेतला.

'मोदी आणि शहा मला विचारतात, पवारांनी काय केलं? धोरणांवर टीका करा, पण वैयक्तिक टीका का? असा सवाल करत शरद पवार यांनी भाजपच्या टीकेला उत्तर दिलं आहे. शरद पवार यांनी थेट पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर निशाणा साधल्याने आगामी काळातही प्रचारादरम्यान राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जोरदार सामना होणार असल्याचं दिसत आहे.

शरद पवार यांच्या भाषणातील ठळक मुद्दे:

- कोणी काही मत मांडलं तर त्याला देशद्रोही ठरवता

- देशातील सर्व महत्वाच्या प्रश्नांवर उत्तर देत नाही फक्त म्हणतात 370 म्हणतात

- निर्मला सीतारामन अमेरिकेत म्हणतात मनमोहन सिंग आणी रघुराम राजन यांनी देशाचं वाटोळं केलं. निवडणूक म्हणून बोलायचं तर देशात बोला, हे योग्य नाही.

- मी ईडी कार्यालयात येतो असं नुसतं म्हटलं आणी सरकार हाललं

- महाराष्ट्र पेटला असता म्हणून मी गेलो नाही

- निवडणूक संपल्यानंतर पाहुणचारला ईडी केव्हा बोलावंतय याची वाट बघतोय

- आघाडीला सत्ता द्या, मी सत्तेत जाणार नाही मात्र जनतेसाठी अंकुश ठेवणार

- घरातील एकानं नोकरी केली पाहिजे आणि दुसऱ्याने शेती

- रोजगार देण्याचा दावा भाजप करतंय, मात्र,उद्योग बंद पडत आहेत

- आहे तीच नोकरी टिकायला तयार नाही,नवीन कुठून देणार?

- देशासाठी विमान तयार करणाऱ्या HAL कंपनीतील कामगारांना रस्त्यावर यावं लागलं

- सरकारचं उद्योग धंद्याकडे लक्ष नाही

- धोरणं राबविता येत नाही

- मुख्यमंत्री म्हणत आहेत निवडणुकीत मजा नाही. तेल लावून तयार आहे

- मी राज्यातील सर्व तालमींचा प्रमुख आहे

- कुस्ती संघटना अध्यक्ष

- जगातील क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष होतो

- कुस्ती खेळतांना कुणाबरोबर कुस्ती खेळायची हे मी ठरवतो

- लहान मुलांबरोबर कुस्ती खेळत नाही

VIDEO : 'देवेंद्र फडणवीस ठरवणार उपमुख्यमंत्री', पाहा काय म्हणाले अमित शाह

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 17, 2019 05:36 PM IST

ताज्या बातम्या