'...तेव्हा त्यांना पोटशूळ उठला होता', शरद पवारांची भाजपवर जहरी टीका

'...तेव्हा त्यांना पोटशूळ उठला होता', शरद पवारांची भाजपवर जहरी टीका

बीडनंतर नांदेडमध्ये पोहचलेल्या शरद पवार यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे.

  • Share this:

नांदेड, 19 सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. पक्षाची विस्कटलेली घडी सावरण्यासाठी आणि विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी शरद पवार स्वत: मैदानात उतरले आहेत. या दौऱ्यात बीडनंतर नांदेडमध्ये पोहचलेल्या शरद पवार यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे.

'आमच्या काळात जगात सर्वाधिक कृषी मालाची निर्यात करणारा देश भारत झाला होता. मी कृषीमंत्री असताना कांद्याचे भाव वाढले म्हणून भाजपवाले गळ्यात कांद्याच्या माळा घालून आले होते. भाव वाढले म्हणजे शेतकऱ्याला फायदा होतो, म्हणून यांना पोटशूळ उठला होता,' असं म्हणत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून शरद पवारांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

'दिल्ली यांची, मुंबई पण यांची अन् सर्वाधिक टीका मात्र माझ्यावर करतात'

लाखाचा पोशिंदा संकटात आहे. 65% लोक शेती करतात पण कर्जबाजारी झाले आहेत. यंदा 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. रिजर्व्ह बँकेने 3 आठवड्यापूर्वी आर्थिक स्थिती चांगली नसल्याचं सांगितलं आहे. दिल्लीपासून सगळीकडे यांची सत्ता आहे, मात्र ते माझ्यावर टीका करतात, असा पलटवार शरद पवार यांनी केला आहे.

शरद पवार यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे:

- पक्ष सोडताना नेते सांगतात विकास करण्यासाठी भाजपमध्ये जात आहे. पण या लोकांना मी अनेकवर्ष मंत्रिपदे दिली होती तेव्हा यांनी विकास केला नाही का ?

- तरुणांना नोकरी नसल्याने ते अविवाहित राहात आहेत

- मराठवाड्यात कारखानदारी मी आणली

- गिरणगाव उध्वस्त झालं. आता त्या ठिकाणी टोलेजंग इमारती उभ्या झाल्यात. तिथं मराठी माणूस नाही.

- या सरकारने किती कारखाने आणले यापेक्षा किती कारखाने बंद पाडले, याची आकडेवारी शासनाने द्यावी.

- नाशिकमध्ये पोलिसांनी हुकूम काढला की विरोधी पक्षांनी घराबाहेर पडले तर अटक करू. हा काय प्रकार आहे?

- मोदी नाशिक सोडेपर्यंत कांदा हातात असता कामा नये. बिचारे कांद्याला एवढे घाबरतात अन् पाकिस्तानला धमकवण्याची भाषा करतात.

- किल्ले हे शौर्याचा इतिहास आहेत. पण सरका ने जाहीर केले पर्यटनासाठी दारू आणि अन्य सुविधा असणार.

- ज्या किल्ल्यात तलवारची आवाज यायचा तिथं आता छमछमचा आवाज येणार.

- निवडणूक लढवणं आता माझ्या सारख्याचं काम राहिलं नाही. नवीन नेतृत्व उभं झालं पाहिजे.

तरुण गेला वाहून; मदत करण्याऐवजी बघ्यांनी शूट केला VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2019 01:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading