शरद पवारांपेक्षा 5 पट श्रीमंत आहेत सुप्रिया सुळे, दोघांकडे आहे इतक्या कोटींची संपत्ती

शरद पवारांपेक्षा 5 पट श्रीमंत आहेत सुप्रिया सुळे, दोघांकडे आहे इतक्या कोटींची संपत्ती

शरद पवार यांची संपत्ती त्यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीच्या केवळ 20 टक्के आहे.

  • Share this:

मुंबई, 12 मार्च : देशभरात राज्यसभा निवडणुकीचं बिगुल फुंकलं गेलं असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकताच या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. यावेळी शरद पवार यांनी आपल्या संपत्तीबाबतचं प्रतिज्ञापत्रक सादर केलं आहे. यातून शरद पवार यांच्याकडे एकूण 32.7 कोटींची संपत्ती असल्याचं समोर आलं आहे. पवार यांची ही संपत्ती त्यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीच्या केवळ 20 टक्के आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी संपत्तीबाबतचं प्रतिज्ञापत्रक सादर केलं. या प्रतिज्ञापत्रकानुसार सुप्रिया सुळे, त्यांचे पती आणि मुलं यांच्याकडे एकूण 165.4 कोटींची मालमत्ता आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या तुलनेत सुप्रिया सुळे या 5 पट श्रीमंत असल्याचं या दोन्ही नेत्यांनी निवडणूक लढवताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांतून समोर आलं आहे.

राज्यसभेसाठी शरद पवारांनी भरला उमेदवारी अर्ज

राज्यसभेच्या 55 जागांसाठी येत्या 26 मार्च रोजी निवडणूक होणार आहे. त्याच दिवशी त्याची मतमोजणी होणार आहे. राज्यात एकूण सात जागांसाठी निवडणूक होत असून विधानसभेतील संख्याबळानुसार महाविकास आघाडीच्या चार आणि भाजपच्या तीन जागा निवडून येऊ शकतात.

हेही वाचा- शिवसेनेनं प्रियंका चतुर्वेदींना संधी देताच खैरेंनी नाराजी व्यक्त करत केला गौप्यस्फोट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (बुधवारी) विधानभवन येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांसह महाराष्ट्र विकास आघाडीच्या इतर नेत्यांच्या उपस्थितीत राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

चौथ्या जागेवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत संघर्ष

महाविकास आघाडीच्या वाट्याला राज्यसभेच्या 4 जागा आल्या आहेत. आघाडीतील तीन पक्षांना त्यापैकी प्रत्येकी एक जागा मिळणार आहे. तर उर्वरित एका जागेसाठी तिन्ही पक्षांमध्ये चढाओढ निर्माण झाली आहे. बॅकफूटवर गेलेल्या काँग्रेसने वाढवला राष्ट्रवादीवर दबाव वाढवला आहे. फौजिया खान यांना उमेदवारी देण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. कारण काँग्रेसने ही एक जागा आपल्याला देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज याबाबत बैठक झाली. मात्र तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे आज रात्री पुन्हा दोन्ही पक्षाच्या नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती आहे.

First published: March 12, 2020, 6:15 PM IST

ताज्या बातम्या