Home /News /maharashtra /

80 वर्षांचे शरद पवार पुन्हा 'फिल्ड'वर, कोरोनाच्या बैठकीनंतर आता कोकणात नुकसान पाहणी

80 वर्षांचे शरद पवार पुन्हा 'फिल्ड'वर, कोरोनाच्या बैठकीनंतर आता कोकणात नुकसान पाहणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पुन्हा एकदा अॅक्शनमध्ये आले आहेत.

    मुंबई, 8 जून: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पुन्हा एकदा अॅक्शनमध्ये आले आहेत. 'निसर्ग' चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्या, मंगळवारी शरद पवार हे दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. चक्रीवादळामुळे कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. 9 जून रोजी रायगड आणि 10 जूनला रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन संपूर्ण माहिती जाणून घेणार आहेत. हेही वाचा...धरणाजवळील ओव्हर ब्रिजची भिंत कोसळली, 2 जणांचा दबून मृत्यू; घटना CCTV मध्ये कैद मंगळवारी 9 जून रोजी सकाळी 8.30 वाजता मुंबईतून गाडीने प्रयाण करणार आहेत. सकाळी 11. 30 वाजता माणगाव, 12.30 वाजता म्हसळा, 1 वाजता दिवेआगार, 2 वाजता श्रीवर्धन, 4 वाजता श्रीवर्धन येथे आमदार, खासदार आणि अधिकारी यांच्यासमवेत बैठक, सायंकाळी 5 वाजता हरिहरेश्वर आणि नंतर 6 वाजता बागमांडलामार्गे दापोलीकडे रवाना होणार आहेत. दापोली येथे मुक्काम करणार आहेत. दरम्यान यावेळी राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे, रायगडच्या पालकमंत्री आणि विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे व स्थानिक आमदार उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी 10 जून रोजी रत्नागिरी जिल्हा दौरा असून सुरुवातीला दापोली येथील नुकसानीची पाहणी करणार आहेत. राज्य सरकारने कोकणच्या जनतेच्या तोंडाला पाने पुसली... दुसरीकडे, विरोधी पक्षाने राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. राज्य सरकारने कोकणच्या जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहे. सरकारच्या या मदतीवर आम्ही विरोधी पक्ष म्हणून समाधानी नाही, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाने प्रचंड नुकसान केलं आहे. परंतु सरकार गंभीर नाही, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे. दापोलीत निसर्ग चक्रीवादळ नुकसान पाहणी करता प्रवीण दरेकर आले आहेत. यावेळी त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केला. हेही वाचा.. पोलीस दलातून आली कोरोनाची धक्कादायक बातमी, नवी आकडेवारी समोर रायगडला 100, रत्नागिरीला 75 तर सिंधुदुर्गास 25 कोटी निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही फटका बसला आहे. संकटाचे परिणाम गंभीर असले तरी सरकार पूर्ण ताकदीने कोकणवासीयांच्या पाठीशी उभे राहील, असे सांगून तातडीची मदत म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगडला 100 रत्नागिरीला 75 कोटी रुपये व सिंधुदुर्गला 25 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. नुकसानाचे पंचनाने पूर्ण झाल्यानंतर आणखी मदत दिली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Cyclone

    पुढील बातम्या