'मोदीजी हिम्मत असेल तर हसत-हसत...', भुजबळांनी दिले हे चॅलेंज

'मोदीजी हिम्मत असेल तर हसत-हसत...', भुजबळांनी दिले हे चॅलेंज

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मोदी सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी ठरल्याचा आरोप क करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल करून त्यांच्यावर जोरदार टीका केली.

  • Share this:

बब्बू शेख, प्रतिनिधी

मनमाड, 18 एप्रिल : धुळे मतदार संघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ आज मालेगावमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या जाहीर सभेतमध्ये  राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मोदी सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी ठरल्याचा आरोप क करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल करून त्यांच्यावर जोरदार टीका केली.

बर इतकंच नाही तर ज्याप्रकारे राज ठाकरे त्यांच्या जाहीर सभेमध्ये पुरावे सादर करत मोदी सरकारवर हल्लाबोल करतात. त्याचपद्धतीने छगन भुजबळांनी पुरावे सादर करत शिवसेना आणि भाजपवर हल्लाबोल केला.

यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत त्यांच्यावर जोरदार टीका केली. भाजपवर टीका करणारे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे आता सगळं विसरले आहेत. त्यामुळे ते माझ्याबद्दल काय बोलले हे सांगण्याची वेळ आल्याचंही छगन भुजबळ म्हणाले.

Lok Sabha Election 2019 : 'घाबरलो असतो तर घरी बसलो असतो'

नाशिकमधून समीर भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारी दिल्यानंतर छगन भुजबळांचा पत्ता का कापला गेला? अशी चर्चा रंगली होती. त्यानंतर आता छगन भुजवळ यांनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोपांना प्रत्युत्तर दिलं. 'आम्ही जर घाबरलो असतो तर घरीच बसलो असतो. जाहीर सभा घेतल्या नसत्या.' असं भुजबळ म्हणाले होते.

हेही वाचा : '...तर तटकरे किस खेत की मूली' म्हणत मुख्यमंत्र्यांचा पवारांना टोला

युवकांना संधी मिळावी या उद्देशानं राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारी दिल्याचं भुजबळ यांनी म्हटलं होतं. नाशिकमधून छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा होती. पण, पुतणे समीर भुजबळ यांना उमेदवारी देण्यात आली. यामध्ये मावळमधून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती.

आणखी काय म्हणाले भुजबळ?

यावेळी बोलताना शरद पवार यांनी आत्तापर्यंत पराभव पाहिलेला नाही. त्यामुळे माघार घेण्याचा संबंध नाही. वंचित आघाडी सोबत यावी यासाठी प्रयत्न केले. त्यांना 4 जागा द्यायची तयारी होती. मात्र आरएसएसवरील बंदी या मागणीमुळे बोलणी फिस्कटल्याचं भुजबळ यांनी म्हटलं. तसेच वंचित आघाडीला, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसोबत समझोता करण्यात रस नव्हता असं आमचं मत असल्याचं देखील भुजबळ यांनी म्हटलं होतं.

सरकारनं विकास कामे केली नाहीत

नोटबंदी, जीएसटी, कर्जमाफी, शेतकरी विरोधी धोरणं यामुळं सरकार विरोधात रोष आहे. नाशिकचा विकास मागील साडेचार वर्षापासून थांबला आहे. भुजबळांना श्रेय मिळू नये म्हणून विकासकामे केली नाहीत. नाशिक बेवारस झालं असून विचारणारं कुणी नाही. अशी टीका यावेळी भुजबळ यांनी केली. आमच्या दोन्ही जागा येणार असा विश्वास यावेळी भुजबळांनी व्यक्त केला.

भाजप नेत्यावर चप्पल फेकून मारल्याने खळबळ, VIDEO समोर

First published: April 18, 2019, 4:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading