अडचणीत सापडलेल्या राहुल गांधींना पवारांचा कानमंत्र, दिला 'हा' सल्ला

अडचणीत सापडलेल्या राहुल गांधींना पवारांचा कानमंत्र, दिला 'हा' सल्ला

अडचणीत सापडलेल्या काँग्रेसला आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक कानमंत्र दिला आहे.

  • Share this:

मुंबई, 1 जुलै : लोकसभा निवडणुकीत देशभरात काँग्रेसला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला असून ते अजूनही आपल्या निर्णयावर ठाम आहेत. अशा अडचणीत सापडलेल्या काँग्रेसला आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक कानमंत्र दिला आहे.

'काँग्रेसचे पुनरुज्जीवन होणं ही देशाची गरज आहे. पण हे होत असताना काँग्रेसची जी मूळ परंपरा आहे, त्याप्रमाणे काँग्रेसला पुन्हा एकदा उभारी देण्याची जबाबदारी नेतृत्वाने घ्यावी. गांधी परिवार हा काँग्रेस पक्षाचा सिमेंटिंग फोर्स आहे. त्यामुळे हा परिवार वगळून काँग्रेस राहणार नाही. पण गांधी परिवारानेही आपण म्हणजेच काँग्रेस या भूमिकेत राहू नये,' असं म्हणत शरद पवार यांनी काँग्रेसच्या उभारीबाबत भाष्य केलं आहे.

काँग्रेसमध्ये राजीनामास्त्र

काँग्रेसमध्ये सध्या कार्यकर्ते आणि नेते राजीनामा देत आहेत. आतापर्यंत जवळपास 150 नेते आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे नव्या अध्यक्षाचं नाव निश्चित व्हायला थोडा अवधी लागू शकतो. लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर राहुल गांधी आपल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ठाम आहेत.

सुशिलकुमार शिंदे अध्यक्ष?

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर नव्या काँग्रेस अध्यक्षपदाबाबत सुरू झालेली चर्चा आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. कारण गांधी घराण्याकडून अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे, अशी माहिती आहे. पण अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्याने नवा अध्यक्ष कोण होणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. पण आता याबाबत निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सुशीलकुमार शिंदे हेच जर काँग्रेसचे अध्यक्ष झाले तर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच कोणीतरी मराठी व्यक्ती या पदावर बसणार आहे.

SPECIAL REPORT : आंटी मत कहो ना ! चुकून म्हणालातच तर...

First published: July 1, 2019, 1:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading