राष्ट्रवादीतून उदयनराजेंविरोधात कोण लढणार? पोटनिवडणुकीच्या घोषणेनंतर हालचालींना येणार वेग

राष्ट्रवादीतून उदयनराजेंविरोधात कोण लढणार? पोटनिवडणुकीच्या घोषणेनंतर हालचालींना येणार वेग

निवडणुकीत उदयनराजेंची कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 24 सप्टेंबर : साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. उदयनराजे यांना आपल्या लोकसभा सदस्यत्वाचाही राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे आता सातारा लोकसभेसाठी महाराष्ट्र विधानसभेसोबतच पोटनिवडणूक होत आहे. निवडणूक आयोगाने नुकतीच याबाबत घोषणा केली. या निवडणुकीत उदयनराजेंची कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

उदयनराजे भोसले यांच्याविरोधात लोकसभेची पोटनिवडणूक लढण्यासाठी राष्ट्रवादीतून 4 दिग्गजांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार आणि नेते शशिकांत शिंदे यांचा आपल्या कोरेगाव मतदारसंघासह साताऱ्यातील इतर भागातही चांगला प्रभाव आहे. त्यामुळे उदयनराजेंविरोधात लढण्यासाठी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे. तसंच शशिकांत शिंदे, नितीन लक्ष्मणराव पाटील, अविनाश मोहिते यांची नावंही राष्ट्रवादीकडून चर्चेत आहेत.

उदयनराजेंना पराभवाची भीती?

'खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसोबत साताऱ्याची पोटनिवडणूक घ्यावी. पोटनिवडणुकीत पराभव झाल्यास राज्यसभेवर नियुक्ती करावी,' या अटी भाजप प्रवेशावेळी उदयनराजेंनी ठेवल्याची चर्चा आहे. त्यामुळे उदयनराजेंना आपण पराभूत होऊ शकतो, ही भीती आहे का, याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.

दरम्यान, उदयनराजे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या इतर आमदारांशीही उदयनराजेंनी कधी जुळवून घेतलं नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. मात्र, शरद पवारांची शिष्टाई कामी आली. पण आता उदयनराजे भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचा मुख्य संघर्ष हा राष्ट्रवादीविरोधात होणार, हे स्पष्ट आहे. त्यामुळे या लढतीत, हे बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

VIDEO: पिंपरीत तृतीयपंथीय उमेदवाराला विधानसभेची संधी, पाहा महत्त्वाच्या टॉप18 न्यूज

Published by: Akshay Shitole
First published: September 24, 2019, 1:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading