विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून काही नावांवर शिक्कामोर्तब, 'हे' आहेत 7 संभाव्य उमेदवार

विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून काही नावांवर शिक्कामोर्तब, 'हे' आहेत 7 संभाव्य उमेदवार

युतीकडून सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 7 सप्टेंबर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत विरोधकांना पुन्हा धक्का देण्यासाठी भाजप-शिवसेनेनं अनेक नेत्यांना आपल्याकडे खेचलं. पण त्यानंतर आता युतीकडून सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधीच राष्ट्रवादीचे सात उमेदवार निश्चित झाल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात नुकतीच पक्षाच्या कोअर कमिटीची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीसाठीची रणनीती तसंच उमेदवारांच्या नावावरही चर्चा झाली. कोणत्या मतदारसंघात आपली शक्तीस्थानं काय आहेत आणि काय नकारात्मक बाजू आहेत, याबाबतही खलबतं झाली. तसंच विधानसभेतील उमेदवारीसाठी पक्षातील काही दिग्गज नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीतून पुन्हा एकदा विधानसभेच्या आखाड्यात उतरणार आहेत. तसंच छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, नवाब मलिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. याबाबत 'लोकसत्ता'ने वृत्त दिलं आहे.

दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संयुक्त प्रचाराचा नारळ सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत सेवाग्राम किंवा धुळ्यामधून फुटण्याची शक्यता आहे. काँग्रेस 138, राष्ट्रवादी 138, आणि 12 जागा मित्रपक्षांना देण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. मित्रपक्षांना सोबत घेण्यासाठी काँग्रेस आपल्या खात्यातील जागा सोडण्यास तयार आहे.

VIDEO : ...अन् पंतप्रधान मोदींसह इस्रोच्या प्रमुखांना अश्रू अनावर

First Published: Sep 7, 2019 10:04 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading