राष्ट्रवादीकडून लोकसभेसाठी 'या' पाच जणांना उमेदवारी निश्चित?

राष्ट्रवादीकडून लोकसभेसाठी 'या' पाच जणांना उमेदवारी निश्चित?

  • Share this:

मुंबई, 23 जानेवारी : लोकसभा निवडणूक जवळ आलेली आहे. अशातच सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभा निवडणुकीत आपल्या पाचही विद्यमान खासदारांना पुन्हा एकदा संधी देण्याची शक्यता आहे.

बारामती, कोल्हापूर, माढा, सातारा आणि भंडारा-गोंदिया या पाच ठिकाणी राष्ट्रवादीचे खासदार आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत असलेल्या मोदी लाटेतही यातील चार खासदारांनी विजय मिळवला होता. तर भंडारा-गोंदियातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने यश मिळवलं. या खासदारांची निवडून येण्याची क्षमता लक्षात घेता राष्ट्रवादी त्यांना पुन्हा संधी देणार असल्याची माहित सूत्रांकडून मिळाली आहे.

राष्ट्रवादीचे पाच खासदार

कोल्हापूर - धनंजय महाडिक

सातारा - उदयनराजे भोसले

बारामती - सुप्रिया सुळे

गोंदिया-भंडारा - मधुकरराव कुकडे

माढा - विजयसिंग मोहिते पाटील

दरम्यान, राज्यभरातील लोकसभा मतदासंघात साताऱ्याची जागा सर्वात जास्त चर्चेत आहे. कारण या जागेवर विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाणार की नाही, याबाबत अजूनही संभ्रम आहे. यातच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत साताऱ्याच्या उमेदवाराबाबत एक वक्तव्य केलं आहे.

सातारा आणि कोल्हापूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असावा, याबाबत निर्णय झाला आहे, अशी माहिती शरद पवारांनी दिली. पण नक्की कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे, हे मात्र पवारांनी सांगितलं नाही. नेहमीप्रमाणे चाणाक्ष शरद पवार यांनी आपले पत्ते इतक्यात उघडे करण्यास नकार दिला आहे.

सातारा आणि कोल्हापूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार उदयनराजे भोसले आणि धनंजय महाडिक यांनाच संधी दिली जाण्याची शक्यता, राष्ट्रवादीच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे साताऱ्याबाबतीत तर स्वपक्षातील स्थानिक आमदारांचा विरोध डावलून उदयनराजेंना पवारांकडून संधी मिळणार का, याची उत्सुकता आहे.

Special Report : जयंत पाटलांनी दुखऱ्या नसेवर हात ठेवताच खडसेंनी बोलून दाखवली खंत

First published: January 23, 2019, 9:36 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading