भाजपविरुद्ध राष्ट्रवादी वाद पेटला.. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी 'ते' पोस्टर्स जाळले

भाजपविरुद्ध राष्ट्रवादी वाद पेटला.. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी 'ते' पोस्टर्स जाळले

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या नाचण्यावर अत्यंत खालच्या शब्दात टीका केल्याने भाजपविरुद्ध राष्ट्रवादी असा वाद पेटला आहे. नाशिकमधील भाजप कार्यकर्ते चांगलेच संतप्त झाले असून अजित पवार यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला जात आहे.

  • Share this:

नाशिक, 7 ऑगस्ट- राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या नाचण्यावर अत्यंत खालच्या शब्दात टीका केल्याने भाजपविरुद्ध राष्ट्रवादी असा वाद पेटला आहे. नाशिकमधील भाजप कार्यकर्ते चांगलेच संतप्त झाले असून अजित पवार यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला जात आहे.

मंगळवारी अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. एवढेच नाही तर राष्ट्रवादी भवनाच्या बाहेरच भाजपचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी अजित पवारांविरोधात निषेधाचे पोस्टर लावले. 'गिरीश महाजन यांच्याबाबत अपशब्द वापरणाऱ्या अजित पवारांचा जाहीर निषेध' अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले होते. यावरून आता राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संतापल्याचे दिसत आहे. युवक आणि युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजप नगरसेवकांनी लावलेल्या पोस्टरला काळे फासून ते जाळले. यामुळे आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा आणखीच चिघळणार असल्याचे चिन्ह दिसू लागले आहे.

अजित पवार यांची जीभ घसरली..

जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याचा मोदी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयाचे स्वागत करत देशभरात जल्लोष साजरा करण्यात आला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही आनंद साजरा करत चक्क डान्स केला आहे. महाजन यांच्या या वर्तनावर अजित पवारांनी आक्षेप नोंदवत टीकास्त्र सोडले. अजित पवार म्हणाले की, नाशिकमध्ये पूरपरिस्थिती असताना काही मंत्री नाचत होते. नाचायचं काम तुमचं नाही, टीव्हीला बघितलं की नाही, काय चाललंय. पाणी आलेलं बघा; नाचताय काय, नाचायचं काम तुमचं नाही, नाचायचं काम नाचणारे करतील, इथे पूर आला आणि मंत्रिमहोदय नाचतात. असं म्हणत अजित पवार यांनी महाजनांवर खोचक टीका केली होती.

गिरीश महाजनांचा पलटवार

अजित पवारांच्या टीकेला गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले. जामनेरमध्ये पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, 'अजित पवारांना मला सांगायचं आहे, गेले तीन दिवस मी नाशिकमध्ये तळ ठोकून होतो. पूरग्रस्त भागात, कंबरभर पाण्यात फिरत होतो. त्यामुळे आम्हाला परिस्थितीचे गांभीर्य आहे. आपल्या सत्तेच्या काळात आपण किती गांभीर्य ओळखून होते, हे आम्हाला चांगला माहिती आहे. अजितदादा, पाणी मागणाऱ्यांना तुम्ही काय बोलला होतात, हे विसरलात का? असं म्हणत महाजन यांनी अजित पवारांवर पलटवार केला.

वर्दीतील महिला पोलिसाचा 'झिंगाट' डान्स VIDEO VIRAL

Tags:
First Published: Aug 7, 2019 04:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading