Elec-widget

युतीचं थांबलं अन् आता आघाडीत बिनसलं, निमित्त ठरलं...

युतीचं थांबलं अन् आता आघाडीत बिनसलं, निमित्त ठरलं...

शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीला राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी आमंत्रण दिलं आहे. त्यासाठी होणाऱ्या बैठका आणि चर्चेवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत.

  • Share this:

मुंबई, 12 नोव्हेंबर : राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी राष्ट्रवादीला निमंत्रण दिलं आहे. दरम्यान, शिवसेनेला पाठिंब्याचं पत्र वेळेत देता न आल्यानं त्यावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत जुंपली आहे. एकीकडे राष्ट्रवादीने काँग्रेसनं पत्र देण्यासा वेळ केल्याचं म्हटलं आहे तर काँग्रेसकडून दिल्लीतील कोअर कमिटीची बैठक रद्द झाल्याचं म्हटलं जात आहे. काँग्रेसकडून सेनेला पाठिंबा द्यायचा की नाही यावर लवकर निर्णय होऊ शकला नाही. तसेच काँग्रेसनं पाठवलेल्या पत्रात शिवसेनेला पाठिंबा देण्याचा उल्लेखच नव्हता त्यामुळे अखेर सेनेला दिलेली वेळ संपली आणि सत्ता स्थापन करण्याचा दावाही करता आला नाही.

आता राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात बैठक होईल असं म्हटलं जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विधानाने गोंधळ उडाला आहे. शरद पवार यांना आज काँग्रेससोबत बैठक होणार आहे का? असं विचारलं असता त्यांनी अशी कोणतीही बैठक होणार नाही असं सांगत मला बैठकीबद्दल काहीच माहिती नाही असं म्हटलं आहे. त्याआधी काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी शरद पवारांमुळे पाठिंब्याचं पत्र वेळेत देता आलं नाही असं म्हटलं होतं. त्यावर अजित पवारांनी पलटवार करत काँग्रेसनंच उशिर केल्याचं म्हटलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं एकत्र निवडणुका लढल्याने पाठिंब्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी मिळूनच घ्यायचा आहे. स्थिर सरकार स्थापन करण्याची गरज आहे. पण एकट्या राष्ट्रवादीने निर्णय घेऊन काही होणार नाही.

अजित पवार यांनी सांगितलं की, काँग्रेसकडून मिळणाऱ्या पाठिंब्याची पत्राची सकाळी दहा पासून संध्याकाली साडेसात पर्यंत सर्वच नेते वाट बघत होते. मात्र पत्र मिळालं नाही. काँग्रेसकडून सकाळी ते मिळेल असं सांगण्यात आलं होतं . त्यानंतर दुपारी मिळेल असं कळवलं. पण शेवटी थोडा वेळ लागेल असं सांगितलं अखेर पोहोचलंच नाही. तसंच राष्ट्रपती राजवट लागली तरी काही होत नाही , मॅजिक फिगर जुळली की पुन्हा सत्तेवर येऊ शकतो जरा सबुरीने घ्या असंही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.

सध्या काँग्रेसचे आमदार जयपूरमध्ये आहेत. वरिष्ठ नेते दिल्लीत असल्यानं चर्चेत अडचणी येत असल्याचं अजित पवार म्हणाले. आम्ही एकटे काही करू शकत नाही. उद्या सरकार स्थापन करायचं असेल तर काँग्रेससोबत चर्चा केल्याशिवाय आम्हाला कोणताही निर्णय़ घेता येत नाही असंही अजित पवार यांनी सांगितलं.

Loading...

VIDEO : शरद पवारांच्या विधानामुळे गोंधळात वाढ, काँग्रेससोबत बैठकीवर दिलं धक्कादायक उत्तर

वेळेअभावी बैठक कोणत्या ठिकाणी घ्यायची हेदेखील महत्त्वाचे आहे. सध्या दिल्लीत ही बैठक घेणं शक्य नाही. सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी वेळ कमी आहे. त्या वेळेत दिल्लीत जाऊन चर्चा करणं आणि पुन्हा इथं येऊन पुढची वाटचाल करणं कठिण असल्याचं अजित पवार म्हणाले.

भाजपने सत्ता स्थापनेस असमर्थता दर्शवल्यानंतर आता शिवसेनेच्या हातात सत्तेची दोरी आहे असं वाटत असतानाच चक्र फिरली आणि राज्याच्या राजकाराणाला अर्ध्या तासात ट्विस्ट मिळाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या निर्णयावर आता महाराष्ट्राचं भवितव्य अवलंबून आहे.

काँग्रेसच्या निर्णयानंतरच निर्णय घेणार अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली होती. शिवसेनेबरोबर जाण्यास सोनिया गांधी, राहुल आणि प्रियांका वाड्रा अनुकूल नसल्याची सूत्रांची माहिती आहे.त्यामुळेच पाठिंब्याचं पत्र वेळेत मिळालं नाही. राष्ट्रवादीशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं काँग्रेसने कळवलं.

अभूतपूर्व! राज्यपालांचं राष्ट्रवादीला निमंत्रण; आता उरल्यात 2 शक्यता

वाचा : अर्ध्या तासांत कसं बदललं सत्तास्थापनेचं चित्र, राष्ट्रपती राजवटीकडे वाटचाल?

VIDEO : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल का? घटनातज्ज्ञ म्हणतात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 12, 2019 12:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...