अमोल कोल्हेंकडून आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेवर सडकून टीका

अमोल कोल्हेंकडून आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेवर सडकून टीका

अमोल कोल्हे यांनी आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेवर हल्लाबोल केला आहे.

  • Share this:

पैठण, 19 ऑगस्ट : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी शिवस्वराज्य यात्रेदरम्यान पैठण इथं युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘थेट निवडणुकीच्या तोंडावरच तुम्हाला लोकांचा आशीर्वाद मागण्याची गरज का पडली,’ असा सवाल करत अमोल कोल्हे यांनी आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेवर हल्लाबोल केला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरानंतर स्थगित करण्यात आलेली राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आज पुन्हा एकदा सुरू झाली आहे. ही यात्रा औरंगाबादच्या पैठण इथं पोहोचल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सत्ताधारी शिवसेना-भाजपवर निशाणा साधला. ‘पाच वर्षात तुम्ही कधी लोकांना काय समस्या आहेत, पैठणमधील शिवसेनेचा आमदार काम करत आहे की नाही, हे जाणून घेतलं नाही. आता निवडणूक जवळ आल्यावर कसे आला आशीर्वाद मागायला? असा प्रश्न तुम्ही आदित्य ठाकरेंना विचारा,’ असं आवाहन अमोल कोल्हे यांनी शिवस्वराज्य यात्रेदरम्यान केलं आहे.

अजित पवारही सरकारवर बरसले

‘राष्ट्रवादीने पूरग्रस्त भागात मदत ओतली मात्र कसलेही फोटो काढले नाहीत. मात्र भाजपच्या मंत्र्यांना पूरग्रस्त भागात सेल्फी काढायला यांना लाज वाटत नाही का? कसली मस्ती चढली यांच्या डोक्यात?’ असा सवाल करत अजित पवार यांनी पूरग्रस्त भागात सेल्फी व्हिडिओ काढणाऱ्या भाजपच्या गिरीश महाजन यांना चांगलंच धारेवर धरलं आहे.

‘शिवसेना रडीचा डाव खेळत आहे. सरकार तुमचं असताना कसले मोर्चे काढताय? अधिकाऱ्यांकडून पैसे काढा आणि शेतकऱ्यांना द्या. खरिपाचा पीक विमा असताना रब्बीचा पीकविमा काढणाऱ्या कंपनीवर यांनी मोर्चा काढला. आता काय कळतंय का यांना?’ असं म्हणत शेतकरी प्रश्नावरून अजित पवार यांनी शिवसेनेवर खरमरीत टीका केली आहे.

SPECIAL REPORT : काय आहे कोहिनूर मिल प्रकरण, राज यांना का बजावली नोटीस?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 19, 2019 03:01 PM IST

ताज्या बातम्या