अमोल कोल्हे पुन्हा मैदानात, राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा 19 ऑगस्टपासून सुरू

अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात होत असलेल्या या यात्रेला 19 ऑगस्टपासून सुरुवात करण्यात येणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 17, 2019 03:49 PM IST

अमोल कोल्हे पुन्हा मैदानात, राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा 19 ऑगस्टपासून सुरू

मुंबई, 17 ऑगस्ट : महाराष्ट्रात पुरपरिस्थितीमुळे तुर्तास स्थगित करण्यात आलेली राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा पुन्हा एकदा सुरू होणार आहे. खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात होत असलेल्या या यात्रेला 19 ऑगस्टपासून सुरुवात करण्यात येणार आहे.

सांगली, कोल्हापूर, सातारा आणि कोकणात पुरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची 6 ऑगस्टला सुरु झालेली शिवस्वराज्य यात्रा नाशिक जिल्हयात बागलाण इथून स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रवादीने आपला मोर्चा पूरग्रस्तांच्या मदतीला वळवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पूरग्रस्तांच्या भेटीला उतरत त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला.

पूरपरिस्थिती साधारण झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा पुन्हा सुरू होत आहे. पैठण येथे संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेवून शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात होणार आहे. 19 ते 26 ऑगस्टपर्यंत ही शिवस्वराज्य यात्रा असणार आहे. शिवाय पुढील तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली आहे.

VIDEO: लहान मुलींवर अत्याचार करत होता नराधम मुख्याधापक, महिलांनी शाळेत जाऊन चोपलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 17, 2019 03:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...