अमोल कोल्हेंचा थेट मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, शिवस्वराज्य यात्रेत जोरदार टीका

अमोल कोल्हेंचा थेट मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, शिवस्वराज्य यात्रेत जोरदार टीका

अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

  • Share this:

शिर्डी, 8 ऑगस्ट : भाजपने काढलेल्या महाजनादेश यात्रेला आक्रमकपणे उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीकडून शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे या यात्रेचा प्रमुख चेहरा आहेत. या यात्रेदरम्यान अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

'अपयश झाकण्यासाठी सरकारने महाजनादेश यात्रा काढली आहे. सरकार यशस्वी असतं तर यात्रा काढाण्याची गरज नव्हती. प्रत्येक स्तरावर राज्यसरकार अपयशी ठरलं आहे,' असा घणाघात खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे.

अजित पवारही सरकारवर बरसले

'पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणी सांगलीचा परीसर महापुराने ग्रस्त आहे. सरकारचा भोंगळ कारभार या गोष्टीला कारणीभूत ठरला. गल्ली ते दिल्ली भाजपाची सत्ता असताना अशी स्थिती का निर्माण झाली? सरकारचं नियोजन नसल्यानेच परिस्थिती ओढावली आहे,' असा आरोप अजित पवार यांनी केला आहे.

राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा

6 ऑगस्टपासून शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात

दररोज तीन ते चार विधानसभा मतदारसंघात जाणार

28 ऑगस्टपर्यंत यात्रा सुरू राहणार

रायगड येथे होणार यात्रेचा समारोप

पतीसमोरच पत्नीला लाठ्या-काठ्याने मारहाण, VIDEO व्हायरल

First published: August 8, 2019, 12:02 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading