अजित पवारांनी पुतण्यासाठी घेतली पहिली सभा, भाजप मंत्र्याच्या मतदारसंघात जोरदार शक्तीप्रदर्शन!

अजित पवारांनी पुतण्यासाठी घेतली पहिली सभा, भाजप मंत्र्याच्या मतदारसंघात जोरदार शक्तीप्रदर्शन!

राष्ट्रवादीतूनच उमेदवारीसाठी इच्छुक असलेले राजेंद्र गुंडसुद्धा या सभेला उपस्थितीत होते. सभेच्या सुरुवातीलाच गुंड यांनी आपला उमेदवारीचा दावा मागे घेत रोहित पवार यांच्या उमेदवारीला समर्थन दिलं.

  • Share this:

अहमदनगर, 24 सप्टेंबर : अहमदनगर इथल्या कर्जत जामखेड मतदार संघात राष्ट्रवादी नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित यावर यांच्या उपस्थितीत निर्धार सभा पार पडली. पुतण्या रोहित पवार यांच्यासाठी अजित पवार यांनी या मतदारसंघात पहिल्यांदाच सभा घेतली. सभेसाठी रोहित पवार यांनी जय्यत तयारी केली होती . या सभेला मतदारसंघातील नागरिकांनीदेखील प्रतिसाद देत मोठी गर्दी केली होती. राष्ट्रवादीतूनच उमेदवारीसाठी इच्छुक असलेले राजेंद्र गुंडसुद्धा या सभेला उपस्थितीत होते. सभेच्या सुरुवातीलाच गुंड यांनी आपला उमेदवारीचा दावा मागे घेत रोहित पवार यांच्या उमेदवारीला समर्थन दिलं. या सभेत अजित पवार यांनी राज्यसरकारच्या कामावर चौफेर फटकेबाजी करत पुतण्या रोहितला निवडून देण्याचं भावनिक आवाहन केलं आहे.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली असली तरी पक्षातील उमेदवारी अद्याप जाहीर झालेल्या नाहीत . असं असलं तरी प्रचाराला मात्र सुरुवात झाली आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत कर्जत इथे झालेल्या निर्धार मेळाव्यात त्यांनी सरकारच्या कामाचा समाचार घेत निवडणूक रणधुमाळी सुरू केली. हे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठलं असं म्हणत जर तुम्ही काम केली आहेत तर का लोक तुम्हाला कडकनाथ कोंबड्या फेकून मारतात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

इतर बातम्या - BREAKING: टोकावर उभं राहून सेल्फी काढताना महिला थेट दरीत कोसळली

अजित पवारांनी या सरकारने केलेल्या शेतकरी कर्जमाफीचा बोजवारा उडाल्याचे सांगत 3-3 वर्ष यांच्या काकांनी कर्जमाफी केली होती का? माझ्या काकांनी एक झटक्यात कर्ज माफी केली आणि ती देखील 71 हजार कोटींची असा टोलाही त्यांनी लगावला. आपल्या भाषणात अजित पवारांनी राम शिंदे यांचाही समाचार घेतला. 'इकडे गावोगावी किती कोटीची कामे केली याचे बोर्ड लावले आहेत. मी बारामतीमध्ये इतकी काम केली मी कधी बोर्ड लावला नाही. काम करणं ही आमची जबाबदारी आहे. त्यासाठी कशाला बोर्ड लावता' असं म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली.

इतर बातम्या - आलंय हिक्का चक्रीवादळ, मुंबईसह कोकणात पावसाची शक्यता

25 वर्षांपासून कर्जत जामखेड मतदारसंघात भाजपचा आमदार आहे काय केलं त्यांनी या मतदारसंघात..?

असा संतप्त सवाल विचारत, 'एकदा रोहितला आमदार करा. जे 25 वर्षात झालं नाही तो विकास 5 वर्षात केल्याशिवाय राहणार नाही . रोहित आमदार झाल्यानंतर इथे लगेच बारामती होणार नाही. मात्र, त्याची सुरुवात झालेली असेल असं सांगत रोहितला साथ द्या. त्याच्याकडून काही चुकलं तर सांभाळून घ्या. नवीन काम करताना माणूस चुकतो' असं भावनिक आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.

Special Report : मनसेचं ठरलं! 122 जागांसाठी अशी केली तयारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 24, 2019 10:23 AM IST

ताज्या बातम्या