बालाजी निरफळ, उस्मानाबाद, 25 जानेवारी : राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे लहान बंधू अमरसिंह पाटील यांचे पुण्यात दुःखद निधन झाले आहे. उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांचे ते सख्खे मेव्हणे होते. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे सख्खे लहान भाऊ अमरसिंह पाटील गेली अनेक वर्षे पुण्यातच वास्तव्यास होते.
अमरसिंह यांना एका आजाराने ग्रासले होते. मधल्या काळात त्यांच्या डोक्यावर अवघड शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. अनेक दिवसांपासून ते अतिदक्षता विभागातच होते.अखेर आज त्यांची प्राणज्योत मावळली.
सरळ व मनमिळावू स्वभाव आणि मार्गदर्शक रूपात असलेले अमरसिंह सर्वांना 'काका' म्हणून परिचित होते. काकांनी तेर गावाचे पाच वर्षे सरपंचपद देखील भूषवले होते. अमरसिंह पाटील काका यांच्या अशा अकाली जाण्याने तेरच्या डॉ.पाटील कुटुंबीय आणि सुनेत्र पवार यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Osmanabad, Padmasinha patil