मुंबई, 12 नोव्हेंबर: राष्ट्रपती राजवट लागली तरी काही होत नसतं, मॅजिक फिगर जुळली की पुन्हा सत्तेवर येऊ शकतो. जरा सबुरीने घ्या, असं अजित पवार यांच म्हणणं आहे. शिवसेना पहिल्यांदा आमच्या सोबत सत्तेत सहभागी होतेय, अशा परिस्थितीत आम्हाला प्रतेक निर्णय विचारपूर्वक घ्यावा आहे. प्रत्येक ठिकाणी आम्हाला उत्तर द्यावे लागणार आहे, या सर्वाना वेळ लागेल. आज निर्णय होईल की नाही हे सांगता येत नाही अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.