अजित पवारांनी वाढवलं उद्धव ठाकरेंचं टेन्शन, मुख्यमंत्री फडणवीस घेणार निर्णय?

अजित पवारांनी वाढवलं उद्धव ठाकरेंचं टेन्शन, मुख्यमंत्री फडणवीस घेणार निर्णय?

अजित पवार यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आक्रमक भूमिका घेतल्याने मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या अडचणी वाढल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 3 जुलै : 'माणसं किड्या-मुंग्यांप्रमाणे मरत असतील तर ते सरकारकचं अपयश आहे. महापालिका बरखास्त करा किंवा प्रशासक नेमा,' अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करत काल (मंगळवारी) राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेत आक्रमक झाले. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महापालिकेवर प्रशासक नेमणार का, याबाबत जोरदार चर्चा रंगत आहे.

'शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेत नेहमी काम झाल्याचं सांगितलं जातं. परंतु परिस्थिती जैसे थे असते. पहिल्या पावसात जनजीवन विस्कळीत होतं. संपूर्ण महापालिकेची चौकशी लावा. महापौर दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई करा. वेळ पडल्यास मुंबई महापालिकेत प्रशासक नेमा, अशी भूमिका अजित पवार यांनी घेतली.

अजित पवार यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आक्रमक भूमिका घेतल्याने मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण गेल्या काही दिवसांपासून मुंबईची तुंबई झाल्याने आधीच शिवसेनेवर जोरदार टीका करण्यात येत आहे. अशातच मुख्यमंत्र्यांनी जर प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला तर ती शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस महापालिकेवर प्रशासक नेमण्याबाबत काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत मोठी दुर्घटना घडली. मालाड परिसरात 1 जुलैच्या रात्री झोपडपट्टीवर भिंत कोसळून 25 जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले.

भिंतीत लपून बसलेल्या अजगराच्या सुटकेचा थरार, पाहा VIDEO

First published: July 3, 2019, 10:51 AM IST
Tags: ajit pawar

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading