पिंपरीत लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचारावरून मुख्यमंत्र्यांवर बरसले अजित पवार, म्हणाले...

पिंपरीत लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचारावरून मुख्यमंत्र्यांवर बरसले अजित पवार, म्हणाले...

अजित पवार यांनी गृहखात असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे.

  • Share this:

पिंपरी-चिंचवड, 17 ऑगस्ट : गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवडमध्ये गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं आहे. यामध्ये मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या महिनाभरातच पिंपरी-चिंचवडमध्ये 5 मुलींवर अत्याचार करण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृहखात असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे.

'माझ्या पिंपरी-चिंचवडची ही काय दशा झाली आहे? लहान मुलींवर अत्याचार होत आहेत. पीडितांना न्याय मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ५ वर्षांत कायद्याचा वचक बसण्यासाठी सरकारनं काय केलं? मुख्यमंत्री, गृह खातं म्हणजे धार नसलेली तलवार बनलं आहे,' असं म्हणत अजित पवार यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करत सरकारविरोधात संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, गुन्हेगारांचं शहर अशी पिंपरी चिंचवडची नवी ओळख निर्माण होतेय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण शहरातमध्ये खून, माऱ्यामाऱ्या, महिला अत्याचार अशा गुन्ह्यांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे.

मागील महिनाभरात पिंपरीत 5 बालिकांवर अत्याचार करण्यात आलेले आहेत. त्यामुळे महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अजित पवार यांनी या मुद्द्यावर थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केल्यानंतर सरकार आणि प्रशासन या गोष्टीची गंभीर दखल घेतं का, हे पाहावं लागेल.

डॉन आहे का तू? पोलिसांनी तरुणाला पट्ट्याने झोड-झोडपलं, VIDEO व्हायरल

First published: August 17, 2019, 2:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading