स्टिअरिंग नक्की कुणाच्या हातात? अजित पवारांच्या फोटोमुळे चर्चेला उधाण

स्टिअरिंग नक्की कुणाच्या हातात? अजित पवारांच्या फोटोमुळे चर्चेला उधाण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 27 जुलै: राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज साठावा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक फोटो ट्वीट करून अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या ट्वीटमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच गाडीत बसले आहेत आणि या गाडीचं स्टिअरिंग अजित पवारांच्या हातात आहे. हा फोटो सध्या घडणाऱ्या घ़डामोडींच्या पार्श्वभूमीवर खूपकाही सांगून जाणारा आहे. या अनोख्या शुभेच्छांमुळे पुन्हा एकदा स्टिअरिंग नक्की कुणाच्या हातात आहे? अशी दबक्या आवाजात कुजबुज सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.

शिवसेना खासदार आणि दैनिक 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की आमचं सरकार तीन चाकी आहे. तिन्ही पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडी हे सरकार चालवत आहे. त्यातील कार्यपद्धती आणि भूमिका जरी काही अंशी वेगळ्या असल्या तरीही या सरकारचं स्टिअरिंग माझ्या हातात असल्याची भूमिका उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली होती.

हे वाचा-'...पण स्टिअरिंग माझ्याच हातात', उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीतील 5 मोठ्या गोष्टी

वाढदिवसानिमित्तानं ट्वीट केलेल्या फोटोत मात्र स्टिअरिंग मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत अजित पवार गाडीत बसले आहेत आणि स्टिअरिंग त्यांच्या हातात असल्याचं दिसत आहे. यामुळे पुन्हा एकदा सरकारचं स्टिअरिंग नक्की कुणाच्या हातात आहे?अशी कुजबुज सुरू झाली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: July 27, 2020, 8:45 AM IST

ताज्या बातम्या