साताऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रम ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक

साताऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रम ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक

कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था वाईट झाली असून कांद्याला चांगला दर मिळावा, अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली. तसंच कांद्याला दिलेलं 200 रुपयांचं अनुदान मान्य नाही, असं म्हणत यासाठी वाढीव मदतीची मागणी राष्ट्रवादीच्या या आंदोलनात करण्यात आली.

  • Share this:

संदीप राजगोळकर,सातारा, 23 डिसेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साताऱ्यात होणाऱ्या कार्यक्रमाच्या ठिकाण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम होत असलेल्या ठिकाणी रस्त्यावर कांदे टाकत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष तेजस शिंदेंनी आक्रमक आंदोलन केलं.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था वाईट झाली असून कांद्याला चांगला दर मिळावा, अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली. तसंच कांद्याला दिलेलं 200 रुपयांचं अनुदान मान्य नाही, असं म्हणत यासाठी वाढीव मदतीची मागणी राष्ट्रवादीच्या या आंदोलनात करण्यात आली.

कांद्यासाठी सरकारकडून अनुदानाची घोषणा

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलमागे 200 रुपयाचं अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारनं काही दिवसांपूर्वी घेतला आहे. अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादकांना काहीसा दिलासा देण्याचा सरकारकडून प्रयत्न करण्यात आला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला .

कांद्यावर अनुदान मिळणार आहे, पण त्याचवेळी 200 क्विंटलची मर्यादा ठेवण्यात आली आहे. 'येत्या काळात कांदा वाहतुकीसाठी अनुदान देण्याचा आणि कांद्यावर प्रक्रिया करण्यासाठी काही करता येईल का, याबाबत सरकारचा विचार सुरू आहे,' अशी माहिती कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी दिली होती.

कर्जवसुली थांबवण्याचा निर्णय

नवीन विधानसभा आस्तित्वात येईपर्यंत शेतकऱ्यांकडून कर्जवसुली थांबवण्य़ाचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता राज्य सरकराचा या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांत काँग्रेसने कर्जमाफी केल्यानंतर महाराष्ट्रात भाजप सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारने काही दिवसांपूर्वीच राज्यात दुष्काळाची घोषणा केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना काही सवलती मिळणार आहेत. त्यात आता कर्जवसुलीस स्थगिती देण्यात आली आहे.

SPECIAL REPORT : रोगापेक्षा इलाज भयंकर, हाडवैद्य की 'हाड'वैरी?

First published: December 23, 2018, 12:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading