पंढरपूर, 02 जून : उसाचे बिल मागितले म्हणून एका शेतकऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी (ncp Workers) धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. व्यासपीठावर कार्यकर्ते या शेतकऱ्याच्या (farmers) अंगावर धावून गेले आणि धक्काबुक्की केली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झालेली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने विचार करण्यासाठी सत्ताधारी चेअरमन भगीरथ भालके गटाने आज बैठक घेतली आहे. या बैठकीत हा प्रकार घडला.
पंढरपुरातील रात्री दाते मंगल कार्यालयात श्री विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे आणि विठ्ठल साखर कारखान्याचे संचालक मंडळ, सभासद यांची निवडणुकीच्या संदर्भात विचारविनिमय बैठक आयोजित केली होती.
यावेळी रोपळे येथील शेतकरी जगन भोसले यांनी माईक वर येऊन आपण अनेक वेळा चेअरमन भगीरथ भालके, राष्ट्रवादी काँग्रेस नेते कल्याणराव काळे यांच्याकडे उसाचे बिल द्यावे अशी मागणी केली होती. मात्र, अद्यापपर्यंत मला उसाचे बिल मिळाले नाही तर अनेक भाषणं केली पण याबद्दल कोणीच बोलायला तयार नाही. अशी व्यथा त्याने मांडली असता, चिडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांनी जगन भोसले याला धक्काबुक्की केली आहे.
(6 महिन्याची मुलगी आणि 2 वर्षांचा मुलाची हत्या करून आईने जाळले मृतदेह)
श्री विठ्ठल कारखाना प्रमुख लोकांसमोरच राडा झाल्याने काही काळ वातावरण तणावग्रस्त झाले होते. यानंतर पुन्हा विचार विनिमय बैठक सुरू झाली. मात्र उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. प्रचार सुरू झाल्यानंतर पुन्हा ऊस बिल प्रश्न मुद्दा प्रचारात गाजणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.