सोलापूर, 16 मे - अभिनेत्री केतकी चितळेने (ketaki chitale) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. भाजपच्या नेत्यांनीही याचे समर्थन केले नाही. मात्र सदाभाऊ खोत यांनी केतकीची पाठराखण केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांना घेरले. यावेळी कार्यकर्ते सदाभाऊ खोतांच्या अंगावर धावून गेले.
अभिनेत्री केतकी चितळे यांना ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेचे नेते माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केतकी चितळे यांचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली. दुपारी सदाभाऊ खोत येत सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहावर काही प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश युवक उपअध्यक्ष प्रशांत बाबर, सुहास कदम जुबेर बागवान, यांच्यासह काही कार्यकर्ते हातात टाळ मृदुंग सहित शासकीय विश्रामगृहात घुसले, सदाभाऊ खोत ज्या रूममध्ये बसले होते तिथे धडक मारली.
पांडुरंगास खोत यांना सद्बुद्धी दे असे म्हणून कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोत यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी अडवले तेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खोत यांचा समोरच निषेध नोंदवत त्यांच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला.
काय म्हणाले होते सदाभाऊ?
केतकी चितळे मला अभिमान असल्याच सांगत ती कणखर आहे. तिला समर्थनाची गरज नाही आणि तिला मानावे लागेल. न्यायालयात तिने स्व:ताची बाजू स्व:ता मांडली, अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी केतकी चितळेच कौतुक केलं आहे.
(सायमंड्सला श्रद्धांजली देताना लक्ष्मणने केली मोठी चूक, नंतर मागितली माफी)
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, चंद्रकात पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टिका करताना तुमची नैतिकता कुठे गेली होती असा सवाल ही सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला विचारला आहे. सदाभाऊ खोत यांनी तुळजापूर येथे तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलं त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी केतकी चितळेचं समर्थन केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.