बीड, 22 जानेवारी : बीडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची गुंडगिरी पाहण्यास मिळाली आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्याने सरपंच पांडुरंग यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
पाटोदा रोहतवाडी गावचे सरपंच पांडुरंग नागरगौजे यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली आहे. भाजपचे काम का करतो, असा जाब विचारून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खुर्ची आणि लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाण करणाऱ्या कार्यकर्ते हे धनंजय मुंडे यांचं समर्थक असल्याचा आरोप पांडुरंग नागरगौजे यांनी केला आहे.
धनंजय मुंडे यांच्याबद्दल चुकीची पोस्ट टाकली होती म्हणून मारहाण करण्यात आली असा दावाही या कार्यकर्त्यांनी फेसबुक पोस्ट टाकून केला. तसंच फेसबुकवर पोस्ट टाकून सरपंच पांडुरंग नागरगौजे यांना धमकीही देण्यात आली. 'धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोलायची लायकी नाही. लायकीनुसार बोलं नाहीतर थेट 302 करण्याची धमकी देण्यात आली.
राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिकांच्या भावाची मुजोरी, कामगाराला केली मारहाण
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचे भाऊ नगरसेवक कप्तान मलिक यांनी काही कामगारांना मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. कुर्ल्याजवळच्या चुनाभट्टी भागात रस्त्याचं काम सुरू होतं. तिथे 4 कामगारांना कप्तान मलिकांनी मारहाण केली. यापुढे इथे दिसलात तर हाय-पाय कापून ठेवीन, अशी धमकीही त्यांनी दिली. कप्तान मलिक यांनी रस्त्यावर सुरू असलेल्या कामावरून मारहाण केल्याने खळबळ उडालीय. रस्त्यावर एका ढिकाणी खोदकाम केलं होते आणि त्याठिकाणी फायबर केबलचं कामही सुरू होतं, या ठीकाणी मलिक आले आणि त्यांनी कामगारांकडून वर्क ऑर्डरची मागणी केली.
मात्र त्यांच्याकडे वर्क ऑर्डर नसल्याचा आरोप करत मलिक यांनी त्यांना मारहाण केली. ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांना धमकी देखील दिली. जा पोलीस ठाण्यात जा आणि माझ्या विरोधात तक्रार कर,यापुढे इथे दिसलात तर हात पाय तोडून टाकू असंही ते म्हणाले. हा व्हिडीओ 1 महिन्या पूर्वीचा आहे, अशी प्रतिक्रिया कप्तान मलिक यांनी दिली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.