भाजमध्ये इनकमिंगचा महापूर! विरोधकांच्या पोटात गोळा आणणारा दानवेंचा दावा

भाजमध्ये इनकमिंगचा महापूर! विरोधकांच्या पोटात गोळा आणणारा दानवेंचा दावा

'राष्ट्रवादीच्या झेंड्याचा दांडाच आमच्या हातात आला आहे. राष्ट्रवादीकडे झेंडाच राहिला नाही म्हणून दुसऱ्या झेंड्याचा शोध घेत आहेत' अशी जहरी टीका दानवेंनी केली आहे.

  • Share this:

विजय कमळे पाटील, प्रतिनिधी

जालना, 27 ऑगस्ट : भाजपमध्ये येण्यासाठी 17 आमदार लाईनमध्ये उभे असल्याचं भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकारणात पुन्हा एकदा नव्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. राणा जगजितसिंह सोमवारी राष्ट्रवादीच्या सभेला गेले नाहीत तसंच 4 आमदार 31 तारखेला मला भेटायला भोकरदFनला येणार असल्याचंही रावसाहेब दानवे म्हणाले आहेत. जालनामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

'तिकीट देण्यासाठी आम्ही कोणाला भाजपमध्ये आणलंच नाही. राजकारणात इच्छा असावी लागते. मात्र, भाजपने कोणाला तिकिटाचे आश्वासन दिलं नाही' असं रावसाहेब दानवे म्हणाले. लोकसभा निवडणुका होण्याआधी आणि आता विधानसभा निवडणुकांच्या पाश्वभूमीवर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी आणि दिग्गज नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यावर आता अजून 17 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं रावसाहेब दानवे म्हणाले आहे.

राष्ट्रवादीच्या भगव्या झेंड्यावर दानवे यांची प्रतिक्रिया

दरम्यान, गेल्या काही दिवसांआधी राष्ट्रवादीने काँग्रेसने सभा आणि शिवस्वराज्य यात्रेमध्ये भगवा फडकवण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर बोलताना दानवे यांनी राष्ट्रवादीवर गंभीर टीका केली आहे. 'राष्ट्रवादीच्या झेंड्याचा दांडाच आमच्या हातात आला आहे. राष्ट्रवादीकडे झेंडाच राहिला नाही म्हणून दुसऱ्या झेंड्याचा शोध घेत आहेत' अशी जहरी टीका दानवेंनी केली आहे. बरं 'शेवटी- शेवटी राष्ट्रवादी भगव्यावर आली' असंही रावसाहेब दानवे म्हणाले.

पुन्हा सत्तेत जाण्यासाठी अधीर झालेल्या राष्ट्रवादीने आता चक्क सेना मनसेचे मुद्दे हायजॅक करायला सुरूवात केली आहे. अजित पवारांनी आधी मनसेचा भूमिपूत्राचा मुद्दा उचलून धरला. त्यानेही काम भागत म्हटल्यावर मग आता चक्क शिवरायांचा भगवा झेंडा हाती घेतला आहे.

बघा दानवे नक्की काय म्हणाले...

VIDEO : भाजपमध्ये येण्यासाठी 17 आमदार लाईनमध्ये उभे, दानवेंचा दावा

इतर बातम्या - राम शिंदे हे बॅनर मंत्री, रोहित पवारांची झणझणीत टीका

पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्यात राष्ट्रवादीला धक्का, माजी खासदाराचा भाजप प्रवेश निश्चित

कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. धनंजय महाडिक यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असल्याचीही माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. लोकसभेतील उमेदवारच पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांना कोल्हापूरमधून लोकसभेची उमेदवारी देण्यास राष्ट्रवादीसह काँग्रेसमधीलही स्थानिक नेत्यांचा विरोध होता. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय महाडिक यांच्या पारड्यात आपलं मत टाकत त्यांना उमेदवारी दिली. देशातील मोदी लाट आणि काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी विरोधात केलेलं काम यामुळे महाडिकांना मोठा पराभव सहन करावा लागला.

इतर बातम्या - खळबळजनक! राज्याच्या तिजोरीवर मोठा डल्ला, मुख्यमंत्र्यांच्या ड्रिम प्रोजेक्टमधून कंत्राटदारांनी लुटले 100 कोटी

धनंजय महाडिक सध्या मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत. महाडिक यांच्या भाजप प्रवेशाची तारीख उद्या निश्चित होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यातच आता कोल्हापूरमधील ताकदवान नेता सोडून जात असल्याने राष्ट्रवादीला चांगलाच धक्का बसणार आहे.

दरम्यान, धनंजय महाडिक यांनी आतापर्यंत 2 वेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. महाडिक यांनी मे महिन्याच्या अखेरीस भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी भेट घेतली होती. तेव्हाच धनंजय महाडिक भाजपच्या वाटेवर असल्याची शक्यता निर्माण झाली होती. पण त्यानंतर धनंजय महाडिक यांनी भाजप प्रवेशाची चर्चा फेटाळली होती.

VIDEO: 'तुम्ही मागितला तर अंगठाही देऊ, पण...' पंकजा मुंडेंचा मुख्यमंत्र्यांना शब्द

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: BJP
First Published: Aug 27, 2019 04:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading