माओवाद्यांकडून तिघांची हत्या, रस्त्यावर टाकले मृतदेह

माओवाद्यांकडून तिघांची हत्या, रस्त्यावर टाकले मृतदेह

गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी तिघांची हत्या केली आहे.

  • Share this:

गडचिरोली, 22 जानेवारी : गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी तिघांची हत्या केली आहे. भामरागड तालुक्यात ताडगावजवळ तिघांची हत्या करून मृतदेह रस्त्यावर टाकण्यात आले आहेत. पोलिसांचा गुप्तहेर असल्याच्या संशयातून ही हत्या करण्यात आल्याचे समजते.

कसनासूर चकमकीत खब-याची भूमिका बजावल्यानेच तिघांना मारत असल्याचे माओवाद्यांनी गावात लावलेल्या बॅनरमध्ये म्हटले आहे. मृतकांचे माओवाद्यांनी दोन दिवसापूर्वी अपहरण केले होते. आज त्याचे मृतदेह आढळले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छत्तीसगडमधील 150 दहशतवाद्यांनी भामरागड तालुक्यातील कसनासूर गावातील तिघांना शस्त्राचा धाक दाखवून गावाबाहेर काढले. त्यानंतर त्यांची हत्या केली. मालू दोगे मडावी, कन्ना रैनू मडावी आणि लालसू मासा कुडयेटी अशी हत्या झालेल्या ग्रामस्थांची नावे आहेत.

यासाठी केली हत्या...

माओवाद्यांनी तिघांच्या हत्येनंतर गावात बॅनर लावले आहेत. 21 एप्रिल 2018 रोजी कसनासूर येथे पोलिसांच्या सोबत झालेल्या चकमकीत 40 माओवादी ठार झाले होते. पोलिसांच्या या कारवाईत या तिघा ग्रामस्थांनी महत्त्वाची भूमिका जबावली होती. म्हणूनच त्यांची हत्या केल्याच बॅनरमध्ये म्हटले आहे.

First published: January 22, 2019, 1:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading