माओवाद्यांचे आज गडचिरोली जिल्हा बंदचे आवाहन, हायअलर्ट जारी

माओवाद्यांचे आज गडचिरोली जिल्हा बंदचे आवाहन, हायअलर्ट जारी

माओवाद्यांचे आज रविवारी गडचिरोली जिल्हा बंदचे आवाहन केले आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 27 एप्रिल रोजी झालेल्या चकमकीच्या विरोधात माओवाद्यांनी गडचिरोली जिल्हा बंदचे आवाहन केले आहे.

  • Share this:

गडचिरोली, 19 मे- माओवाद्यांचे आज रविवारी गडचिरोली जिल्हा बंदचे आवाहन केले आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 27 एप्रिल रोजी झालेल्या चकमकीच्या विरोधात माओवाद्यांनी गडचिरोली जिल्हा बंदचे आवाहन केले आहे. गेल्या 1 मेपासून जिल्हयात माओवाद्यांनी सुरु केलेल्या हिंसक कारवाया लक्षात घेता संपूर्ण जिल्ह्यासह तीन राज्याच्या सीमावर्ती भागात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

SPECIAL REPORT : लोकसभेनंतर अशोक चव्हाणांची खुर्ची धोक्यात?

दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आज सिरोंचा तालुक्याच्या सीमेवरील कालेश्वर मेडीगड्डा प्रकल्पाला भेट देणार आहेत. या पार्श्वभूमीवर तेलंगणाच्या सुरक्षा यंत्रणांनी सीमेवर बंदोबस्त करुन या भागाच्या सीमांवर भागावर लक्ष केंद्रीत केले आहे तर दुर्गम भागातल्या पोलीस ठाण्यांच्या सुरक्षा बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. सतर्कतेच्या सुचना पोलीस ठाण्याना देण्यात आल्या आहेत.

ठिकठिकाणी लावले लाल बॅनर

माओवाद्यांनी दुर्गम भागात काही ठिकाणी लाल रंगाचे बॅनर मोठ्या प्रमाणात लावले आहेत. या बॅनरच्या माध्यमातून माओवाद्यांनी येत्या 19 मे रोजी गडचिरोली जिल्हा बंदचं आवाहन केलं आहे. एट्टापली तालुक्यातील गुरूपल्ली मार्गावर तसेच आलापल्ली मार्गावर तसेच भामरागड मार्गावर माओवाद्यांनी बॅनर लावले आहेत. धक्कादायक म्हणजे, गडचिरोली सी-सिक्स्टी पोलीस कमांडो पथकाचाही बॅनरवर उल्लेख करण्यात आला आहे.

गेल्या 2 मे रोजी रामको तसेच शिल्पा ध्रुवा या महिला माओवाद्यांना खोटया चकमकीत मारल्याचा आरोप माओवाद्यांनी केला आहे. या बनरमुळे दुर्गम भागात दहशतीचे सावट पसरले आहे.

VIDEO : केदारनाथमध्ये पंतप्रधान मोदींची ध्यानसाधना

गडचिरोलीचे माओवादी पोहोचले मुंबई-पुण्यात..

राज्यात एकीकडे महिनाभरापासून माओवाद्यांच्या हिंसक कारवाया होताहेत. दुसरीकडे गडचिरोलीचा माओवादी मुंबई- पुण्यापर्यंत पोहोचल्याने शहरी माओवादाचेही आव्हान आहे. असे असताना राज्यातील एका प्रतिष्ठित विद्यापिठाकडून माओवादी विचारांचे उदात्तीकरण सुरु असल्याचे समोर आले आहे.

माओवाद्यांचा विरोध करणाऱ्या भुमकाल संघटनेने पुणे विद्यापीठाच्या वेबसाइटवरूनच माओवादी विचारांचा प्रचार आणि प्रसार होत असल्याचा पुराव्यानीशी आरोप केला आहे. भुमकाल संघटनेनं पुणे विद्यापीठाच्या वेबसाइटवरील प्रोजेक्ट अंतर्गत जवळपास पाचशे मानवाधिकारांच्या हननाशी संबंधित काही कागदपत्रांची डॉक्युमेंटस वेबसाइटवर टाकलेले आहे. धक्कादायक म्हणजे यातील काही डाँक्टुमेंट्स ही प्रतिबंधित खतरनाक माओवादी संघटनांची आहेत.

मे महिन्याच्या सुरवातीपासून राज्यातील माओवाद्यांच्या हिंसक कारवाया सुरु आहेत. महाराष्ट्र दिनी माओवाद्यांच्या हल्ल्यात पंधरा जवान आणि एक नागरिक शहिद झालेत. माओवाद्यांनी हिंसक कारवाया करत जिल्हाबंदची हाकही दिलीय. गडचिरोलीत अशी हिंसा सुरु असताना शहरी माओवाद्यांचाही प्रसार रोखण्याचे आव्हान महाराष्ट्र पोलिसांवर आहे. मुंबई आणि पुणे शहरापर्यंत शहरी माओवाद पोहोचला असतांनाच नक्षलविरोधी संघटना भुमकालने पुणे विद्यापीठचं माओवादी विचारांना हातभार लावत असल्याचा दावा केलाय.

VIDEO: योगी आदित्यनाथ यांनी काय वर्तवलं भाकित?

First published: May 19, 2019, 8:28 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading