मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

गडचिरोली जिल्हा बंदचं आवाहन..माओवाद्यांनी ठिकठिकाणी लावले लाल बॅनर

गडचिरोली जिल्हा बंदचं आवाहन..माओवाद्यांनी ठिकठिकाणी लावले लाल बॅनर

माओवाद्यांनी दुर्गम भागात काही ठिकाणी लाल रंगाचे बॅनर मोठ्या प्रमाणात लावले आहेत. या बॅनरच्या माध्यमातून माओवाद्यांनी येत्या 19 मे रोजी गडचिरोली जिल्हा बंदचं आवाहन केलं आहे.

गडचिरोली, 16 मे- माओवाद्यांनी दुर्गम भागात काही ठिकाणी लाल रंगाचे बॅनर मोठ्या प्रमाणात लावले आहेत. या बॅनरच्या माध्यमातून माओवाद्यांनी येत्या 19 मे रोजी गडचिरोली जिल्हा बंदचं आवाहन केलं आहे. एट्टापली तालुक्यातील गुरूपल्ली मार्गावर तसेच आलापल्ली मार्गावर तसेच भामरागड मार्गावर माओवाद्यांनी बॅनर लावले आहेत. धक्कादायक म्हणजे, गडचिरोली सी-सिक्स्टी पोलीस कमांडो पथकाचाही बॅनरवर उल्लेख करण्यात आला आहे.

गेल्या 2 मे रोजी रामको तसेच शिल्पा ध्रुवा या महिला माओवाद्यांना खोटया चकमकीत मारल्याचा आरोप माओवाद्यांनी केला आहे. या बनरमुळे दुर्गम भागात दहशतीचे सावट पसरले आहे.

गडचिरोलीचे माओवादी पोहोचले मुंबई-पुण्यात..

राज्यात एकीकडे महिनाभरापासून माओवाद्यांच्या हिंसक कारवाया होताहेत. दुसरीकडे गडचिरोलीचा माओवादी मुंबई- पुण्यापर्यंत पोहोचल्याने शहरी माओवादाचेही आव्हान आहे. असे असताना राज्यातील एका प्रतिष्ठित विद्यापिठाकडून माओवादी विचारांचे उदात्तीकरण सुरु असल्याचे समोर आले आहे.

माओवाद्यांचा विरोध करणाऱ्या भुमकाल संघटनेने पुणे विद्यापीठाच्या वेबसाइटवरूनच माओवादी विचारांचा प्रचार आणि प्रसार होत असल्याचा पुराव्यानीशी आरोप केला आहे. भुमकाल संघटनेनं पुणे विद्यापीठाच्या वेबसाइटवरील प्रोजेक्ट अंतर्गत जवळपास पाचशे मानवाधिकारांच्या हननाशी संबंधित काही कागदपत्रांची डॉक्युमेंटस वेबसाइटवर टाकलेले आहे. धक्कादायक म्हणजे यातील काही डाँक्टुमेंट्स ही प्रतिबंधित खतरनाक माओवादी संघटनांची आहेत.

मे महिन्याच्या सुरवातीपासून राज्यातील माओवाद्यांच्या हिंसक कारवाया सुरु आहेत. महाराष्ट्र दिनी माओवाद्यांच्या हल्ल्यात पंधरा जवान आणि एक नागरिक शहिद झालेत. माओवाद्यांनी हिंसक कारवाया करत जिल्हाबंदची हाकही दिलीय. गडचिरोलीत अशी हिंसा सुरु असताना शहरी माओवाद्यांचाही प्रसार रोखण्याचे आव्हान महाराष्ट्र पोलिसांवर आहे. मुंबई आणि पुणे शहरापर्यंत शहरी माओवाद पोहोचला असतांनाच नक्षलविरोधी संघटना भुमकालने पुणे विद्यापीठचं माओवादी विचारांना हातभार लावत असल्याचा दावा केलाय.

VIDEO: मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेला मारहाण करत हिसकावली सोनसाखळी

First published: