नक्षलवादी आणखी हिंसक.. भामरागडमध्ये एकाची निर्घृण हत्या

नक्षलवादी आणखी हिंसक.. भामरागडमध्ये एकाची निर्घृण हत्या

कुरखेडा तालुक्यातील वाहने जाळपोळ आणि भुसुरूंग स्फोटानंतर नक्षलवादी आणखी हिंसक झाले आहेत. भामरागड तालुक्यातील मर्दहूर गावाजवळ एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना आज (रविवारी) उघडकीस आली आहे.

  • Share this:

प्रवीण मुधोळकर(प्रतिनिधी)

नागपूर, 5 मे- कुरखेडा तालुक्यातील वाहने जाळपोळ आणि भुसुरूंग स्फोटानंतर नक्षलवादी आणखी हिंसक झाले आहेत. भामरागड तालुक्यातील मर्दहूर गावाजवळ एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना आज (रविवारी) उघडकीस आली आहे. मागील सहा दिवसांत ही तिसरी घटना आहे. पोलीस खबऱ्या असल्याचा संशयावरून नक्षलवाद्यांनी या व्यक्तीची हत्या केली.

डोंगा कोमटी वेडदा असे मृत व्यक्तीचे नाव असून तो नैनवाडी येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. तो लग्नसमारंभासाठी मर्दहूर येथे आला होता. या ठिकाणी रात्रीच्या सुमारास नक्षल्यांनी त्याचे अपहरण करून त्याची हत्या केली. घटनेचा तपास सुरू असून अद्याप मृतकाचे नाव समजू शकले नाही.

लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाल्यापासून नक्षलवादी हिंसक कारवाया करत आहेत. पोलिस विभाग नक्षलविरोधी अभियान राबवित आहे. असे असतानाही महाराष्ट्र दिनी कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथे रस्ता कामावरील वाहनांना पेटवून देण्यात आले होते. त्यानंतर जांभुळखेडा गावाजवळ भुसुरूंग स्फोट घडवून आणला. यात 15 पोलिस जवान शहीद झाले होते. तसेच खासगी वाहनचालक ठार झाला होता. या घटनांमुळे जिल्ह्यात तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.

गडचिरोलीतील नक्षली हल्ल्याची भीषणता दाखवणारा पहिला VIDEO

First published: May 5, 2019, 4:34 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading