गडचिरोलीत माओवाद्यांच्या भूसुरुंग स्फोटात 12 जवान जखमी

गडचिरोलीत माओवाद्यांच्या भूसुरुंग स्फोटात 12 जवान जखमी

सीआरपीएफ-क्रोबा कमांडो आणि महाराष्ट्र पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झालीये

  • Share this:

03 मे : माओवाद्यांनी पुन्हा एकदा डोकं वर काढत जवानांवर हल्ला केलाय. गडचिरोलीमध्ये माओवाद्यांच्या भुसुरुंग स्फोट घडवून आणला असून या स्फोटात बारा जवान जखमी झाले आहे. सुदैवाने  या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही.

गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील कोपर्सीच्या जंगलात सी-60 कोबरा कमांडोच्या टीमला घेऊन जाणाऱ्या वाहनावर माओवाद्यांनी हल्ला केला. जखमी पोलिसांनी हेलिकाॅप्टरच्या मदतीने रायपुरमधील रुग्णालयात नेण्यात येत आहे. जखमींमध्ये 2 पोलीस आणि एक सीआरपीएफ जवानाचा समावेश आहे. या चकमकीनंतर परिसरात कोम्बिंग आॅपरेशन सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हल्ल्याच्या वेळी सीआरपीएफ आणि डीएफचे जवान कोम्बिंग करण्यासाठी जंगलात गेले होते. त्याचवेळी घात लावून बसलेल्या माओवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. जोपर्यंत जवान जागा घेऊन प्रतिहल्ला करतील तोपर्यंत 3 जवान जखमी झाले होते. यानंतर जवानांनी प्रतिउत्तर देण्यास सुरुवात केली तेव्हा जंगलाच्या मार्गे माओवाद्यांनी पळ काढला.

कोपर्सीच्या जंगलात झालेल्या चकमकीच्या घटनेनंतर जवान परतत असतांना माओवाद्यांच्या अम्बुशमध्ये जवान फसले. माओवाद्यांनी  जवानांना घेऊन येणारे भुसुरुंगविरोधी वाहन उडवलं. भुसुरुंगस्फोटानंतरही माओवाद्यांनी गोळीबार केला. या स्फोटात 12 जवान जखमी झाले.

सीआरपीएफ-क्रोबा कमांडो आणि महाराष्ट्र पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झालीये. याआधी 24 एप्रिलला माओवाद्यांनी छत्तीसगडमधील सुकमामध्ये मोठा हल्ला केला होता यात 25 जवान शहीद झाले होते.

First published: May 3, 2017, 10:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading